'रक्षाबंधन' निमित्ताने शाळांनी जोडला सामाजिक बांधिलकीचा धागा

विद्यालयातील विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. शाळेमध्ये शिकत असणाऱ्या अनेक निरागस, आई-वडिलांपासून दूर असणाऱ्या मुलांना राखी बांधताना मुलींच्या डोळ्यात अश्रू तरळताना दिसले.

 'रक्षाबंधन' निमित्ताने शाळांनी जोडला सामाजिक बांधिलकीचा धागा

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ज्या भावांना बहिणी नाहीत अशा भावांची बहिणीची उणीव दूर करण्याच्या हेतूने व मुलींमध्ये संवेदनशीलतेचे मूल्य व संस्कार  रुजावेत यासाठी खराडी येथील गेनबा सोपानराव मोझे संस्थेच्या सुंदरबाई मराठे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोरेगाव पार्क येथील अंध शाळेतल्या विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

हेही वाचा : शाळांमध्ये आठवड्यातून फक्त २९ तास अध्यापन; अभ्यासाचा ताण कमी

सुंदरबाई मराठे विद्यालयातर्फे विविध सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.भारतीय संस्कृतीत,प्रमुख सणांमध्ये रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो.त्यामुळेच विद्यालयातील विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. शाळेमध्ये शिकत असणाऱ्या अनेक निरागस, आई-वडिलांपासून दूर असणाऱ्या मुलांना राखी बांधताना मुलींच्या डोळ्यात अश्रू तरळताना दिसले.

गेल्या दहा वर्षापासून विद्यालयांच्या वतीने अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम या शाळेमध्ये जाऊन राबवले जात आहेत.  विद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना लाडू भरून त्यांचे तोंड गोड केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील वळसे व मीनाक्षी शहापुरे यांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ मोझे,उपाध्यक्ष,  ज्ञानेश्वर मोझे, अलका पाटील ,मुख्याध्यापक  संजय सोमवंशी यांनी या उपक्रमास प्रोत्साहन दिले.