Pune News : लाच प्रकरणात इतरही अधिकारी? अभाविपचे महापालिकेसमोर आंदोलन

डॉ. बंगिनवार यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या अटकेमुळे महापालिकेमध्ये खळबळ उडाली आहे.

Pune News : लाच प्रकरणात इतरही अधिकारी? अभाविपचे महापालिकेसमोर आंदोलन
ABVP Protest

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुणे महापालिकेच्या (PMC) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे (Atal Bihari Vajpayee Medical College) अधिष्ठाता डॉ. आशिष बंगिनवार (Dr Ashish Banginwar) यांना १० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने (ACB) अटक केली आहे. याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी गुरूवारी महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन केले. प्रशासनातील इतर अधिकारी पदाधिकाऱ्यांचाही यामध्ये सहभाग असू शकतो, त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्याची मागणी अभाविपकडून करण्यात आली.

डॉ. बंगिनवार यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या अटकेमुळे महापालिकेमध्ये खळबळ उडाली आहे. त्यावरून अभाविपने महापालिकेतील अधिकाऱ्यांनाही लक्ष्य केले आहे. लाच घेऊन वैद्यकीय प्रवेश करणे असे भ्रष्ट कार्य आहेच. फक्त एका आरोपीचे हे काम नसावे, यात इतरही पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी सामिल असतील का? असा प्रश्न अभाविप कार्यकर्त्यांनी मांडला. यामुळे प्रशासनाने सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अभाविपने आंदोलनात केली.

शिफारस पत्रांना वाहिली श्रध्दांजली! ९४ मराठा उमेदवार १४ महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत

अभाविपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यावेळी बोलताना म्हणाले, ‘गांव बसा नहीं, और लुटेरे हाजीर’, अशी गत या ठिकाणी झाली आहे. विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. परंतु काही लाचखोर आधिकारी पैशांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील जागेत भ्रष्टाचार करून त्या जागा विकतात. हा विद्यार्थ्यांवर होणारा अतिशय निंदनीय अन्याय आहे. अशा भ्रष्ट कृत्यांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा.

महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे, त्यामुळे राज्य शासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने CET  Cell ला चुकीची माहिती पाठवून दिशाभूल केली आहे व जागा कमी आहेत असे विद्यार्थ्याना सांगितले आहे. त्यामुळे यामध्ये संस्थाचालकांचे हित शासन स्तरावर नेमक कोण जोपासत आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ठोंबरे यांनी केली. यावेळी महानगर सहमंत्री तुषार काहूर, जिल्हा संयोजक मंदार लडकत, नगर मंत्री जयेश कोळी, सई थोपटे इत्यादी कार्यकर्ते व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo