ज्ञानेश्वर साळुंके यांना उप कुलसचिव या पदावर पदोन्नती

कनिष्ठ सहायक ते उपकुलसचिव असा  त्यांचा आजपर्यंतचा  प्रवास आहे.

ज्ञानेश्वर साळुंके यांना उप कुलसचिव या पदावर पदोन्नती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहायक कुलसचिव ज्ञानेश्वर साळुंके यांना उपकुलसचिव या पदावर पदोन्नती देण्यात आली. त्यांच्या कुशल, कार्यक्षम पारदर्शक कारभाराची व अनुभवाची  विद्यापीठ प्रशासनाला निश्चितच मदत होईल . कनिष्ठ सहायक ते उपकुलसचिव असा त्यांचा आजपर्यंतचा  प्रवास आहे. कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे यांनी पदोन्नती आदेश जारी केला आहे. 
साळुंके यांनी विद्यापीठात अनेक प्रशासकीय विभागात विविध पदावर जबाबदारी पार पाडली आहे. विद्यापीठात त्यांनी आरक्षण विभाग, निवडणूक विभाग, प्रशासन शिक्षक कक्ष आणि सभा व दफ्तर विभाग या ठिकाणी सहायक कुलसचिव म्हणून उत्तमरीत्या जबाबदारी पार पाडली आहे.  सध्या ते विद्यापीठाच्या गृहव्यवस्थापन विभाग येथे कार्यरत आहे.