SSC GD 2024 : सुरक्षा दलातील भरती परीक्षेची अधिसूचना निघाली ! अर्ज करून तयारीला लागा, अशी असेल प्रक्रिया  

SSC GD 2024 Recruitment exam :  स्टाफ सिलेक्शन कमिशनने  केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, एनआयए, विशेष सुरक्षा दल आणि आसाम रायफल्समध्ये भरती परीक्षेची अधिसूचना काढली आहे. ज्यांना सशस्त्र दलात जाण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे.  

SSC GD 2024 : सुरक्षा दलातील भरती परीक्षेची अधिसूचना निघाली ! अर्ज करून तयारीला लागा, अशी असेल प्रक्रिया  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

SSC GD 2024 Recruitment exam: सशस्त्र दलात भरती होणाची अनेकांची इच्छा असते. हीअशी इच्छा बाळगणाऱ्यांना सुवर्ण संधी चालून आली आहे. स्टाफ सिलेक्शन कामिटीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs), एनआयए (NIA), विशेष सुरक्षा दल (SSF) आणि आसाम रायफल्समध्ये भरती परीक्षेसाठी अधिसूचना काढली आहे.  २०२३-२४ च्या संभाव्य परीक्षेच्या कॅलेंडरमध्ये ही भरती जाहीर करण्यात आली आहे. 

सशस्त्र दलाची भरती प्रक्रिया शुक्रवार पासून (दि २४) पासून सुरू करण्यात आली आहे.  संभाव्य कॅलेंडरनुसार, SSC GD 2024 या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत २८ डिसेंबर २०२३ राहणार आहे.

हेही वाचा : JEE Advanced परीक्षेची तारीख जाहीर; एप्रिलमध्ये सुरू होणार प्रक्रिया

लेखी परीक्षा कधी घेतली जाणार ?


जनरल ड्युटी विभागांतर्गत येणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, एनआयए व विशेष सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदासाठी तर, आसाम रायफल्समध्ये रायफलमन पदासाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही  लेखी परीक्षा २०, २१, २२, २३, २४, २६, २७, २८,२९ फेब्रुवारी आणि १, ५, ६, ७, ११, १२ मार्च २०२४ रोजी होणार आहे. एसएससीच्या संकेत स्थळावर परीक्षेसंबंधीच्या महत्त्वाच्या तारखा, पात्रता निकष, अर्ज शुल्क या बाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या साठी  ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यावी लागेल.

कसा भरावा अर्ज ? 

संकेत स्थळांच्या होमपेजवरील 'अप्लाय' या पर्यायाला सिलेक्ट करून त्यावर  कॉन्स्टेबल GD हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल.  यानंतर  २०२४ च्या परीक्षा अर्जाची लिंक उघडेल . या ठिकणी लॉगिन करून तुम्हाला तुमच्या नावाची नोंदणी करावी लागणार आहे.   लॉगिन केल्यावर  अर्ज भरण्यासाठी पुढे जाता येईल. अर्ज भरून झाल्यावर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यानंतर परीक्षा शुल्कासह तुमचा फॉर्म सबमिट करावा. विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भातील पुढील बाबींसाठी भरलेल्या अर्जाची एक प्रत डाउनलोड करून ठेवावी.