RRB असिस्टंट लोको पायलट भरती परिक्षेची तारीख जाहीर 

सूचनेनुसार, RRB ALP CBT 1 परीक्षा जुलै 2024 च्या पहिल्या आठवड्यात होईल. CBT 1 नंतर , पुढील टप्पे लवकरच जाहीर केले जातील. RRB ALP परीक्षेसाठी हॉल तिकीट नियोजित परीक्षेच्या तारखेच्या 7-10 दिवस आधी प्रसिद्ध केली जातील.

RRB असिस्टंट लोको पायलट भरती परिक्षेची तारीख जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

रेल्वे भरती बोर्डाने (Railway Recruitment Boards) RRB ALP CBT 1 परीक्षा (RRB ALP CBT 1 Exam) संदर्भात अधिकृत वेबसाइटवर एक सूचना प्रसिद्ध केली आहे. सूचनेनुसार, RRB ALP CBT 1 परीक्षा जुलै 2024 च्या पहिल्या आठवड्यात (Exam in first week of July 2024) होईल. CBT 1 नंतर , पुढील टप्पे लवकरच जाहीर केले जातील. RRB ALP परीक्षेसाठी प्रवेशपत्रे नियोजित परीक्षेच्या तारखेच्या 7-10 दिवस आधी प्रसिद्ध केली जातील. मात्र,उमेदवारांनी लक्षात ठेवावे की या परीक्षेच्या तारखा तात्पुरत्या आहेत. नेमकी तारीख तपासण्यासाठी उमेदवारांना वेळोवेळी पोर्टलला भेट द्यावी लागेल.

(एएलपी आणि तंत्रज्ञ) साठी अर्ज केलेल्या सर्व पात्र उमेदवारांना सूचित केले जाते की, जुलै 2024 च्या पहिल्या आठवड्या संगणक आधारित चाचणी (सीबीटी) घेतली जाईल, असे रेल्वे भर्ती बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या सुचना पत्रात म्हटले आहे.  

CBT च्या वास्तविक तारखा योग्य वेळी सूचित केल्या जातील, उमेदवारांनी वरील गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि GDCE-2023 परीक्षेच्या अपडेट्स आणि माहितीसाठी RRC/SC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत रहावे, असे सांगण्यात आले आहे. 

रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटच्या पदांसाठी भरतीसाठी उमेदवारांची निवड विविध टप्प्यांमध्ये होणाऱ्या परीक्षेच्या आधारे केली जाईल. यामध्ये पहिल्या टप्प्यातील CBT 1 आणि दुसऱ्या टप्प्यातील CBT 2 टप्प्याचा समावेश आहे. याशिवाय, तिसऱ्या टप्प्यात संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT) आणि चौथ्या टप्प्यात दस्तऐवज पडताळणी (DV) आणि वैद्यकीय चाचणीचा समावेश आहे.