क्ल्स्टर विद्यापीठ : नियमावलीत स्पष्टता आणि शिथिलता असावी; तज्ज्ञांची मागणी

अनुदानित महाविद्यालयांचे अस्तित्व आबाधित ठेवून क्लस्टर विद्यापीठाची स्थापना करावी.अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा वेळोवेळी भरण्यास मान्यता देण्यात यावी.विद्यापीठ स्थापन करणाऱ्या संस्थांकडून घेतली जाणारी अनामत रक्कम कमी करावी.

क्ल्स्टर विद्यापीठ :  नियमावलीत स्पष्टता आणि शिथिलता असावी; तज्ज्ञांची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार national educational policy) राज्यात क्लस्टर विद्यापीठे (Cluster University) स्थापन केली जाणार असून त्यासंदर्भातील  मार्गदर्शक तत्त्वांना राजमंत्री मंडळाने मान्यता दिली आहे.मात्र, अद्याप त्याचा अध्यादेश किंवा नियमावली प्रसिद्ध केली गेली नाही.मात्र, या विद्यापीठाच्या स्थापनेबाबत अनेकांना उत्सुकता आहे. त्यामुळे नियमावली (rules) लवकर प्रसिध्द करून त्यात स्पष्टता आणावी,अशी मागणी केली जात आहे.त्याचप्रमाणे सर्व शिक्षण संस्थाचालकांना क्लस्टर विद्यापीठांकडे जाता येईल,अशी लवचिकता या नियमावलीत असावी, अशीही अपेक्षा केली जात आहे.

हेही वाचा : 'इनोव्हेशन हब' निर्मितीच्या दिशेने शासनाचे पहिले पाऊल ; कार्यबल गट स्थापन

अनुदानित महाविद्यालयांचे अस्तित्व आबाधित ठेवून क्लस्टर विद्यापीठाची स्थापना करावी.अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा वेळोवेळी भरण्यास मान्यता देण्यात यावी.विद्यापीठ स्थापन करणाऱ्या संस्थांकडून घेतली जाणारी अनामत रक्कम कमी करावी.आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये क्लस्टर विद्यापीठात येणार किंवा नाही याबाबत स्पष्टता आणावी,अशी अपेक्षा क्लस्टर विद्यापीठ स्थापनेस इच्छूक असणाऱ्या संस्था चालकांकडून केली जात आहे. 

क्ल्स्टर विद्यापीठ नियमावली काय ? : कोणत्या महाविद्यालयांचे रूपांतर होऊ शकते समूह विद्यापीठात : डॉ. शैलेन्द्र देवळाणकर

------------------------

" क्ल्स्टर विद्यापीठाची संकल्पना निश्चितच चांगली आहे. मात्र, सर्व घटकांना क्ल्स्टर विद्यापीठाची संकल्पना स्पष्ट होत नाही तोपर्यंत ती अंमलात आणण्याबाबत पूर्णविचार करावा. कारण क्ल्स्टर विद्यापीठे आणण्या मागचा दृष्टीकोन समजणे गरजेचे आहे. "
- डॉ. अरुण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ 
---------------------

 "क्लस्टर विद्यापीठाचे स्वागतच आहे. पण शासनाकडून त्यासंदर्भातील अध्यादेश प्रसिध्द होत नाही तोपर्यंत याबाबत स्पष्टता येणार नाही.आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचा समावेश क्लस्टर विद्यापीठामध्ये करता येणार आहे किंवा नाही हे सुध्दा समजायला हवे." 
- डॉ.गजानन एकबोटे, कार्याध्यक्ष , प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी

------------------------

" अनुदानित महाविद्यालयांचे पाच वर्षांनंतर काय होणार आहे.अनिदानित पदावरील व्यक्ती सेवानिवृत्त झाला किंवा काही कारणांमुळे ते पद रिक्त झाले तर ते पद कायम राहणार आहे का ? समूह विद्यापीठात आलेल्या व्यक्तीला शासनाकडून मिळणारे सर्व आर्थिक लाभ सुरू राहणार आहेत का ? हे प्रथम शासनाने स्पष्ट करायला हवे. " 
प्रा.एस. पी . लावांडे, अध्यक्ष , एम. फुक्टो 
--------------------

" शासनाने आणलेल्या क्ल्स्टर विद्यापीठ संकल्पनेचे निश्चितच स्वागत केले पाहिजे. परंतु, शासनाने काही नियमावलीमध्ये शिथीलता आणणे गरजेचे आहे. मुदत ठेवा म्हणून पाच कोटीची ठेवा ठेवावी लागणार आहे. पण लहान संस्थांना हे शक्य नसल्याने ही रक्कम कमी करावी. तसेच अनुदानित महाविद्यालयांचे काय होणार ? यामध्ये सुध्दा पारदर्शकता आणावी." 
- डॉ.सुधाकर जाधवर, अध्यक्ष , आखील भारतीय प्राचार्य फेड्रेशन 
-------------------