अखेर मुहुर्त ठरला! महाराष्ट्र पोलिसांच्या कॉन्स्टेबल पदांसाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरु

पोलिसांनी कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांसाठीचे अर्ज उद्यापासून म्हणजेच मंगळवार, 5 मार्च 2024 पासून सुरू.

अखेर मुहुर्त ठरला! महाराष्ट्र पोलिसांच्या कॉन्स्टेबल पदांसाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरु

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police Recruitment) काही दिवसांपूर्वी कॉन्स्टेबलच्या बंपर पदांसाठी भरतीची सूचना प्रसिद्ध केली होती. या रिक्त पदांसाठीचे अर्ज (Application for vacancies) उद्यापासून म्हणजेच मंगळवारपासून (दि. 5 )मार्च 2024 पासून सुरू होतील. ज्या उमेदवारांना महाराष्ट्र पोलिसांच्या कॉन्स्टेबल पदांसाठी (Constable post) अर्ज करायचा आहे ते नोंदणी लिंक सक्रिय झाल्यानंतर mahapolice.gov.in, policerecruitment2024.mahait.org या अधिकृत वेबसाइटला (Official website) भेट देऊन फॉर्म भरू शकतात.  

पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आणि जेल कॉन्स्टेबल या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे आहे.  खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये शुल्क भरावे लागेल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 350 रुपये शुल्क भरावे लागेल. 

शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, कौशल्य चाचणी, ड्रायव्हिंग चाचणी, लेखी परीक्षा. सर्व टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांचीच निवड अंतिम असेल.