जिल्हा परिषद भरती : परीक्षेच्या दिवसापर्यंत उमेदवारांना प्रवेशपत्रच नाहीत

परीक्षेच्या किमान ८ दिवस आधी प्रवेशपत्र देणे अपेक्षित असते, परंतु परीक्षेच्या दिवसापर्यंत सुद्धा प्रवेश पत्र उपलब्ध होणार नसतील तर या उमेदवारांनी काय करावे?

जिल्हा परिषद भरती : परीक्षेच्या दिवसापर्यंत उमेदवारांना प्रवेशपत्रच नाहीत
NCP MLA Rohit Pawar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात सध्या विविध जिल्हा परिषदांची पदभरतीची (ZP Recruitment) प्रक्रिया सुरू आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP) पदभरतीसाठी बुधवारी परीक्षा आयोजित केली होती. पण अनेक उमेदवारांना परीक्षेच्या दिवसांपर्यंत प्रवेशपत्रच मिळाली नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी केला आहे.

 

रोहित पवार यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, नाशिक जिल्हा परिषदेच्या पदभरतीसाठी अर्ज केलेल्या अनेक उमेदवारांची परीक्षा आज असताना त्यांना अद्यापही प्रवेशपत्रे प्राप्त झालेले नाहीत. वास्तविक परीक्षेच्या किमान ८ दिवस आधी प्रवेशपत्र देणे अपेक्षित असते, परंतु परीक्षेच्या दिवसापर्यंत सुद्धा प्रवेश पत्र उपलब्ध होणार नसतील तर या उमेदवारांनी काय करावे? जर वेळेवर प्रवेशपत्रे उपलब्ध होत नसेल, उमेदवारांना परीक्षा देता येत नसेल तर सरकारने १ हजार रुपये परीक्षा फी वसूल का केली? याला जबाबदार कोण, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे.

MPSC News : टंकलेखन कौशल्य चाचणीबाबत आयोगाने दिली महत्वाची अपडेट

 

ज्या उमेदवारांची प्रवेशपत्रे उपलब्ध झाली नाहीत, त्यांची माहिती संकलित करून त्यांची नव्याने परीक्षा घ्यावी, या उमेदवारांवर अन्याय करू नये, अशी विनंती पवार यांनी केली आहे. दरम्यान, सातत्याने पेपरफुटी होत असल्याच्या  पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.

 

पवार यांनी म्हटले आहे की, परीक्षा जाहीर होते अन् पेपर फुटतात हे आता राज्यातील नोकर भरतीचे समीकरणच झाले असून राज्यातील लाखो युवांच्या भविष्याशी खेळण्याचे काम सरकार करत आहे. वृत्तपत्रांनी पेपरफुटीच्या बातम्या दिल्या, विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या, मी ट्वीट केले म्हणून आमच्यावर हक्कभंग आणणार का? फडणवीस साहेब तुम्ही #serious होऊन काही कारवाई करणार की फक्त खोटंच बोलत राहाणार? पेपरफुटीसंदर्भात आज ना उद्या तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k