तलाठी भरती: नॉर्मलायझेशनच्या नावाखाली गुण वाढीचा फंडा ? यामुळेच उडाला गोंधळ

नॉर्मलायझेशननंतर अनेक विद्यार्थ्यांचे 40 ते 50 गुण वाढल्याचा आरोप परीक्षा दिलेल्या काही विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

तलाठी भरती: नॉर्मलायझेशनच्या नावाखाली गुण वाढीचा फंडा ? यामुळेच उडाला गोंधळ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

तलाठी भरतीसाठी (Talathi Bharti)विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये काही अवघड तर काही सोप्या प्रश्नपत्रिका होत्या. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अवघड प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या त्यांना नॉर्मलायझेशन करून गुणवाढ देण्यात आली. परंतु, नॉर्मलायझेशननंतर(Normalization) अनेक विद्यार्थ्यांचे 40 ते 50 गुण वाढल्याचा आरोप परीक्षा दिलेल्या काही विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. परिणामी विद्यार्थ्यांना 214, 204, 202 असे गुण मिळाले आहेत. त्यामुळे टीसीएस कंपनीच्या कार्यपद्धतीवर संशय घेतला जात आहे.

बँकिंग सहकारी परीक्षांसाठी नॉर्मलायझेशन ही पद्धती वापरली जाते. परंतु , ही पद्धत नेमकी काय आहे. एखाद्या विद्यार्थ्याला अवघड स्वरूपाची प्रश्नपत्रिका दिल्यानंतर नॉर्मलायझेशनचा वापर केल्यावर त्याला किती गुणांपर्यंत वाढ होते. याबाबतचे सूत्र टीसीएस कंपनीने किंवा राज्य शासनाने प्रसिद्ध विद्यार्थ्यांना याबाबत स्पष्ट कल्पना देणे गरजेचे होते. तसेच परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना याबाबत सुरुवातीपासूनच संदर्भात सखोल मार्गदर्शन करणे आवश्यक होते. परंतु ,अनेक विद्यार्थ्यांना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. त्यामुळे नॉर्मलायझेशनच्या नावाखाली गुणवाढ केली जात असल्याचा संशय विद्यार्थ्यांकडून घेतला जात आहे. त्यामुळे राज्य शासन निकाल जाहीर झाल्यानंतर तरी नॉर्मलायझेशनमुळे विद्यार्थ्यांचे गुण कसे वाढले ? हे सांगणार आहे का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विद्यार्थ्यांना 200 पैकी जास्तीत जास्त 200 गुण मिळू शकतात.परंतु नॉर्मलायझेशनमुळे विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून येत आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा समज आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पेपर फुटीच्या घटना घडल्यामुळे नॉर्मलायझेशनच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार करून काही मुलांच्या गुणांमध्ये वाढ केला असल्याचा संशय त्यामुळे अधिक बळावत चालला आहे.परिणामी याबाबत टीसीएस कंपनीला व राज्य शासनाला स्पष्टीकरण देणे भाग पडणार आहेत, असे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांकडून सांगितले जात आहे