UPSC CSE Result : यंदा  मुलांनी मारली बाजी, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, तर अनिमेष दुसरा.. 

२०२३ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षांचे हे निकाल असून upsconline.nic.in आणि upsc.gov.in या संकेतस्थळांवर सविस्तर निकाल पाहाता येईल.

UPSC CSE Result : यंदा  मुलांनी मारली बाजी, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, तर अनिमेष दुसरा.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (Central Public Service Commission) निकाल जाहीर (Results announced) झाले असून आदित्य श्रीवास्तव देशात पहिला (Aditya Srivastava first in the country), अनिमेष प्रधान देशात दुसरा तर देशात तिसऱ्या क्रमांकावर दोनुरू अनन्या रेड्डी आहे. मागील दोन परीक्षांच्या निकालामध्ये यूपीएससीमध्ये पहिले तीन क्रमांक मुलींनीच पटकावल्याचे दिसून आले होते. यंदा मात्र 'हम किसीसे कम नही' असे म्हणत मुलांनी बाजी मारली आहे.  २०२३ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षांचे हे निकाल असून upsconline.nic.in आणि upsc.gov.in या संकेतस्थळांवर सविस्तर निकाल पाहाता येईल.

यंदा यूपीएससीच्या परीक्षांमध्ये १०१६ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ३४७ उमेदवार खुल्या प्रवर्गाचे, ११६ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे, ३०३ उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे, १६५ उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गाचे तर ८६ उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण खुला प्रवर्ग - ३४५, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग - २८, ओबीसी - ५२, अनुसूचित जाती - ५ तर अनुसूचित जमाती - ४ असे होते.

देशात टाॅप १०  मध्ये आलेल्या उमेदवारांची यादी

1) 2629523 आदित्य श्रीवास्तव, 2) 6312512 अनिमेष प्रधान 3) 1013595 दोनुरु अनन्या रेड्डी 4) 1903299 पी के सिद्धार्थरामकुमार 5) 6312407 रुहानी 6) 0501579 सृष्टि डबास 7) 3406060 अनमोल राठौड 8) 1121316 आशीष कुमार 9) 6016094 नौशीन 10) 2637654 एश्वर्यम प्रजापति

असा पाहाल UPSC चा निकाल?
upsc.gov.in या संकेतस्थळावर UPSC CSE Results या लिंकवर क्लिक करा. आपले लॉगइन डिटेल्स इथे भरा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसू लागेल. निकालपत्र डाऊनलोड करण्याचा पर्याय इथे देण्यात आला आहे.