राज्य अभ्यासक्रम आराखडा मंजूरीसाठी सुकाणू समितीकडे

राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार केल्यानंतर एससीईआरटीतर्फे त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या.राज्यभरातून 1 हजार 263 हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या.

 राज्य अभ्यासक्रम आराखडा मंजूरीसाठी सुकाणू समितीकडे

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य अभ्यासक्रम आराखडा (state curriculum framework - scf 2023) तयार केला असून तो मंजूरीसाठी सुकाणू समितीकडे सादर केला आहे.त्यास मंजूरी मिळाल्यानंतर येत्या शैक्षणिक वर्षांपासून त्यांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे,असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील (State Council of Educational Research and Training) अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : SSC GD 2024 : सुरक्षा दलातील भरती परीक्षेची अधिसूचना निघाली ! अर्ज करून तयारीला लागा, अशी असेल प्रक्रिया

एनईपी अंमलबजावणीच्या दृष्टीने राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे विविध पातळ्यांवर काम सुरू आहे.राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार केल्यानंतर एससीईआरटीतर्फे त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या.राज्यभरातून 1 हजार 263 हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या.त्यातील काही सूचनांचा स्वीकार करून राज्य अभ्यासक्रम आराखडा पुढील मंजूरीसाठी सुकाणू समितीकडे पाठवण्यात आला आहे.मात्र, अद्याप त्यास मान्यता मिळाली नाही. 

नवीन शैक्षणिक धोरण राज्यात राबविण्याच्या दृष्टीने शासनाकडून सकारात्मक पाऊले उचलली जात आहेत.उच्च शिक्षण विभागाने चालू शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणीस सुरूवात केली आहे.शालेय शिक्षण विभागाने पुढील शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.