SPPU News : ज्योत्स्ना एकबोटे यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड

छाननीमध्ये चार जणांचे अर्ज बाद करण्यात आल्यानंतर अध्यापक गटातून तिघांचे तर महिला गटातून चौघांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले होते.  

SPPU News : ज्योत्स्ना एकबोटे यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) व्यवस्थापन परिषदेवर (Management Council) प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या (PES) सहकार्यवाह  ज्योत्स्ना एकबोटे (Jyotsna Ekbote) यांची बिनविरोध निवड झाली आहे. विद्या परिषदेतून (Academic Council) निवडून देण्यात येणाऱ्या दोन सदस्यांची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून एकबोटे यांची महिला गटातून बिनविरोध निवड झाली आहे. (SPPU Election)

 व्यवस्थापन परिषदेवर विद्या परिषदेतून दोन सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. छाननीमध्ये चार जणांचे अर्ज बाद करण्यात आल्यानंतर अध्यापक गटातून तिघांचे तर महिला गटातून चौघांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले होते.

सीएचबी प्राध्यापक दसरा-दिवाळीला उपाशी ?

 महिला गटातून ज्योत्स्ना एकबोटे यांच्यासह पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या संगिता जगताप, आदर्श शिक्षण मंडळीचे आदर्श महाविद्यालयाच्या राजश्री जायभाय आणि समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयातील वीणा नरे यांचा अर्ज होता.

संगिता जगताप व राजश्री जायभाय यांचा अध्यापक गटातूनही अर्ज होता. या दोघींसह नरे यांनी महिला गटातील आपले अर्ज मागे घेतले. बुधवारी (दि. १८) सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. तीन अर्ज मागे घेण्यात आल्याने महिला गटातून केवळ एकबोटे यांचा अर्ज उरला आहे. त्यामुळे या गटातून एकबोटे यांनी बिनविरोध निवड झाली आहे. याबाबत विद्यापीठाकडून अधिकृत घोषणा केली जाईल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व जागांवर बिनविरोध सदस्य निवडून आणण्याची किमया झाली. यामध्ये अधीसभा ,विद्या परिषद व सरते शेवटी व्यवस्थापन परिषदेवर सर्व जागांवर विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सल्लागार राजेश पांडे यांनी पुढाकार घेऊन सर्व घटकांना एकत्र करून सर्व निवडणुका बिनविरोध करण्याचे योजले होते. त्यास मोठे यश प्राप्त झाले.आहे. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ विकास मंच चांगली कामगिरी करेल व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला एकूणच मोठा नावलौकिक मिळवून सर्व निवडून आलेले सदस्य देतील,  असे प्रतिपादन राजेश पांडे यांनी यावेळी केले . 

---------------------------------

मी एम. एस्सी.चे  शिक्षण विद्यापीठातील विभागातूनच पूर्ण केले.  तसेच विद्यापीठाच्या वसतीगृहात राहिले.त्यामुळे विद्यापीठ माझ्यासाठी आई सामान आहे.आधिसभा,  विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषद या तीनही अधिकार मंडळाच्या माध्यमातून मला काम करण्याची संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न समाजावून घेऊन ते सोडवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तीनही अधिकार मंडळातून काम करील. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांच्या विकासासाठी कायम काटिबद्ध राहील. तसेच विद्यापीठाचे राष्ट्रीय व जागतिक स्तरावर मानांकन वाढवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न करील. 

ज्योत्स्ना एकबोटे, सहकार्यवाह, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k