विद्यापीठांमधील अभ्यासमंडळाचा मंच स्थापन होणार; सात कुलगुरूंची समिती करणार आराखडा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या धोरणाचा अभ्यास करुन राज्य शासनास अहवाल सादर करण्यासाठी प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यबल गट स्थापन करण्यात आला होता.

विद्यापीठांमधील अभ्यासमंडळाचा मंच स्थापन होणार; सात कुलगुरूंची समिती करणार आराखडा

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील (Universities in Maharashtra) विषयाच्या अभ्यासमंडळाच्या अध्यक्षांचे प्रतिनिधीत्व असलेला ई-अभ्यासमंडळ मंच (E- BOSF) स्थापन केला जाणार आहे. या मंचाचा आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून (Government of Maharashtra) मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) कुलगुरूंच्या अध्यक्षतेसाठी सात कुलगुरूंची समिती स्थापन केली आहे. ही समिती मंचाला मार्गदर्शन करण्याबरोबरच अभ्यासक्रम (Curriculum) व श्रेयांक आराखडा एकसमान राहण्याच्या दृष्टीने विद्यापीठांमध्ये समन्वयही साधेल. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या धोरणाचा अभ्यास करुन राज्य शासनास अहवाल सादर करण्यासाठी प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यबल गट स्थापन करण्यात आला होता. राज्यामध्ये एकसमान अभ्यासक्रम आराखडा तयार होण्याच्या तसेच विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांची देवाण-घेवाण होण्याच्या दृष्टीने डॉ. माशेलकर कार्यबल गटाने ई-अभ्यासमंडळ मंचाची स्थापन करण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी समन्वय समिती गठित करण्यात आली आहे.

दहावी व बारावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश

ही समन्वय समिती विद्यापीठांच्या अभ्यासमंडळा प्रमाणे विषय / गट निहाय/ विद्याशाखानिहाय ई- अभ्यासमंडळ मंच स्थापन करण्याबाबत विचारविनिमय करुन त्याप्रमाणे ई- अभ्यासमंडळ मंचांची स्थापना करण्याबाबत शासनास शिफारस करेल. तसेच ई- अभ्यासमंडळ मंचामधील सदस्य संख्या व प्रतिनिधीत्व, मंचाच्या प्रभावी कामकाजासाठी आराखडा तयार करेल व त्याच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन व मंचाचे सनियंत्रण करेल. सर्व ई- अभ्यासमंडळ मंचांच्या वार्षिक अहवालांचा कार्यकारी सारांश समन्वय समितीद्वारे संकलित केला जाईल आणि कुलगुरुच्या संयुक्त बैठकीत (जेबीव्हीसी) मध्ये सादर केला जाईल.

राज्यामध्ये एकसमान अभ्यासक्रम आराखडा तयार होण्याच्या तसेच विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांची देवाण-घेवाण होण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. समन्वय समितीचा कालावधी हा प्रथम टप्यात दोन वर्षासाठी असेल. समितीला आपल्या शिफारशी शासनास एक महिन्याच्या कालावधीत सादर कराव्या लागणार आहेत. 

अशी असेल समन्वय समिती

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू समितीचे अध्यक्ष असतील. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ व एसएनडीटी विद्यापीठाचे कुलगुरू समितीचे सदस्य असतील. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo