सीएचबी प्राध्यापक दसरा-दिवाळीला उपाशी ?

विद्यापीठाने या प्राध्यापकांच्या मान्यतेचे पत्र लवकरात लवकर द्यावे,अशी मागणी केली आहे.मात्र, त्यावर युध्द पातळीवर काम सुरू असून आठवड्याभरात सर्वांना मान्यतेचे पत्र पाठवण्याचा प्रयत्न आहे,असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगितले जात आहे. 

सीएचबी प्राध्यापक दसरा-दिवाळीला उपाशी ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्न महाविद्यालयांमध्ये तासिका तत्वावर (CHB professors) नियुक्त केलेल्या प्राध्यापकांचे मान्यतेचे पत्र विद्यापीठाकडून दिले गेले नाही.त्यामुळे संबंधित प्राध्यापकांचे वेतनाचे प्रस्ताव शासनाकडे पाठवता आले नाही.परिणामी सुमारे चार महिन्यांपासून त्यांना वेतन (Salary ) मिळू शकले नाही.त्यामुळे या प्राध्यापकांचा दसरा आणि दिवाळी कडू होणार का? असा सवाल माजी आधिसभा सदस्य संतोष ढोरे (Santosh dhore) यांनी उपस्थित केला आहे. तसेच विद्यापीठाने या प्राध्यापकांच्या मान्यतेचे पत्र लवकरात लवकर द्यावे,अशी मागणी केली आहे.मात्र, त्यावर युध्द पातळीवर काम सुरू असून आठवड्याभरात सर्वांना मान्यतेचे पत्र पाठवण्याचा प्रयत्न आहे,असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगितले जात आहे.  

हेही वाचा : शिक्षण फेलोशिपमध्ये घसघशीत वाढ; 'युजीसी'ने चार वर्षांनंतर घेतला निर्णय

 शासकीय अनुदानित तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे वेतन उच्च शिक्षण सह संचालक कार्यालयातर्फे केले जाते.मात्र, त्यासाठी सर्व नियमांचे पालन करण्याची व कागतपत्रांची पूर्ताता करणे आवश्यक आहे. विद्यापीठाच्या मानेतेचे पत्र असल्याशिवाय महाविद्यालयांना संबंधित प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाकडे सादर करता येत नाही.विद्यापीठाने 30 सप्टेंबरपर्यंत सीएचबी प्राध्यापकांचे प्रस्ताव सादर करण्यास मुदत दिली होती.त्यानुसार सुमारे १६०० ते १७०० प्रस्ताव प्राप्त झाले.सर्व प्रस्तावयांची छाणणी करून संबंधितांना मान्यतेचे पत्र देण्याचे काम सुरू आहे.

 राज्य शासनाने सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ केली आहे.त्यामुळे वाढीव मानधनानुसार प्राध्यापकांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.मात्र, सध्या काही प्राध्यापकांना संस्थेकडूनच सुमारे १५ ते २० हाजार रुपये मानधन दिले जात आहे.तर काहींना जुलै २०२३ पासून वेतानाच मिळाले नाही.परंतु,मान्यतेचे पत्र मिळाल्यानंतर वेतनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

--------------------

" विद्यापीठाकडे ३० सप्टेंबरपर्यंत प्राप्त झालेल्या एकूण प्रस्तावापैकी सुमारे ७०० ते ८०० तासिका तत्वावरील प्राध्यापकांना मान्यतेचे पत्र दिले आहे.विद्यापीठ प्रशासनाकडून त्यावर युध्द पातळीवर काम सुरू आहे.अधिकाचे मनुष्यबळ लावून प्राध्यापकांच्या मान्यतेच्या पत्र तयार केले जात .पुढील आठ दिवसात सर्वांना मान्यतेचे पत्र देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे."

- डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ