विद्यार्थ्यांचे भाषा आणि गणिताचे ज्ञान जाणून घेण्यासाठी विशेष परीक्षा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत ही परीक्षा आयोजित केली जात आहे. याद्वारे इयत्ता ३री आणि ६वीच्या विद्यार्थ्यांमध्ये भाषा आणि गणिताचे मूलभूत आकलन तपासले जाईल.

विद्यार्थ्यांचे भाषा आणि गणिताचे ज्ञान जाणून घेण्यासाठी विशेष परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क


नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) कडून इयत्ता ३री, ६वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांची भाषा (Language) आणि गणिताचे (Mathematics) ज्ञान जाणून घेण्यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी देशभरातून सुमारे ५ लाख सरकारी आणि खासगी शाळांमधून एकूण १ कोटी १२ लाख ७२ हजार ८३६ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. दि. ३ नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे. 

 

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत ही परीक्षा आयोजित केली जात आहे. याद्वारे इयत्ता ३री आणि ६वीच्या विद्यार्थ्यांमध्ये भाषा आणि गणिताचे मूलभूत आकलन तपासले जाईल. तसेच, इयत्ता ९वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेतून ते त्यांच्या वर्गात किती शिकू शकतात हे स्पष्ट होईल. 

प्राथमिक शाळेत इंग्रजीसह इतर परदेशी भाषा शिकविण्यास बंदी; ‘या’ देशाचा अजब निर्णय

 

परीक्षेच्या अहवालाच्या आधारे शालेय शिक्षणात आवश्यक बदल करण्यावर भर दिला जाईल. कारण या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे वय आणि वर्गाच्या आधारे किती समज विकसित होत आहे हे कळेल. या सर्वेक्षणादरम्यान त्यांच्या वर्गात आणि मागील वर्गात दिलेल्या शिक्षणाबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात. ही चाचणी शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेप्रमाणेच आहे.

 

इयत्ता तिसरीची परीक्षा एक तासाची म्हणजेच ६० मिनिटांची असेल. यामध्ये गणित आणि भाषा विषयातून एकूण ४० प्रश्न विचारले जाणार आहेत. तर इयत्ता सहावीची परीक्षा ७५ मिनिटांची असेल. यामध्ये गणित आणि भाषा विषयातून ५० प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर नववीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना ९० मिनिटांचा वेळ मिळेल. यामध्ये एकूण ६० प्रश्न विचारले जाणार आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k