एमआयटीने रद्द केला काश्मिरी पत्रकार सफीना नबी यांचा पुरस्कार; राजकीय दबाव असल्याचा आरोप 

एमआयटीने राजकीय दाबावामूळे हा पुरकार रद्द केल्याचे वृत्त 'द वायर'ने प्रसिध्द केले. मात्र, गैरसंवादामुळे ही दुर्दैवी परिस्थिती उद्भवली असल्याचे एमआयटीकडून कळविण्यात आले आहे. 

 एमआयटीने रद्द केला काश्मिरी पत्रकार सफीना नबी यांचा पुरस्कार; राजकीय दबाव असल्याचा आरोप 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 काश्मिरी पत्रकार सफीना नबी Kashmiri journalist Safina Nabi यांना पुण्यातील एमआयटी- वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (MIT world peace University) मीडिया स्कूल द्वारे दिला जाणारा पुरस्कार अचाचक रद्द (award cancel) झाल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे शिक्षण वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.एमआयटीने राजकीय दाबावामूळे हा पुरकार रद्द केल्याचे वृत्त 'द वायर'ने प्रसिध्द केले. मात्र, गैरसंवादामुळे ही दुर्दैवी परिस्थिती उद्भवली असल्याचे एमआयटीकडून कळविण्यात आले आहे. 

हेही वाचा : शिक्षण प्राथमिक शाळेत इंग्रजीसह इतर परदेशी भाषा शिकविण्यास बंदी; ‘या’ देशाचा अजब निर्णय
एमआयटी- वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून विविध राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय यासह पत्रकारितेच्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.भारतीय छात्र संसद या कार्यक्रमाच्या माध्यमातून एमआयटी विद्यापीठ युवकांपर्यंत पोहचले असून या कार्यक्रमातही अनेक मान्यवर सहभागी होतात.त्यात त्यांचा यथोचित सन्मानही केला जातो. मात्र,एमआयटीच्या मीडिया स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या पूर्व संधेला काश्मिरी पत्रकार सफीना नबी यांना दिला जाणारा पुरस्कार रद्द करण्यात आला.त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सफीना नबी यांचे पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम आहे.त्यांनी विधवांच्या प्रश्नावर अभ्यासपूर्ण लेखन केले.ज्यांचे पाती गायब झाले आहेत,आशा महिलांना अनेक दशके संपत्तीचा हक्क नाकारला जातो, या प्रश्नाला त्यांनी वाचा फोडली होती.त्यांच्या आशा विविध लेखनाची दाखल घेऊन त्यांना एमआयटीतर्फे पुरस्कार दिला जाणार होता.एमआयटीतर्फे स्थापना करण्यात आलेल्या समितीने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली होती,असे असताना पुरकार का रद्द केला गेला.यावर सध्या राष्ट्रीय स्तरावर उलट- सुलट चर्चा सुरू आहे.

एमआयटी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ही एक पारदर्शक, अराजकीय आणि निःपक्षपाती संस्था आहे. केवळ अंतर्गत गैरसंवादामुळे ही दुर्दैवी परिस्थिती उद्भवली आहे.सफीना नबी यांच्या पत्रकारीतेतील  मोठ्या कार्याचा आम्ही आदर करतो. आगामी मोठ्या पुरस्कार सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्याची चर्चा झाली आहे.