Food Supply Inspector Recruitment : अन्न पुरवठा निरीक्षकाच्या सुमारे 350 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु ; २५ ते ८१ हजार रुपये पगाराची नोकरी

रिक्त जागा अन्न पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरीय लिपिक यांच्यासाठी आहेत.

Food Supply Inspector Recruitment : अन्न पुरवठा निरीक्षकाच्या सुमारे 350  जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु ; २५ ते ८१ हजार रुपये पगाराची नोकरी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

Food Supply Inspector Recruitment : महाराष्ट्र, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाकडून (Department of Food, Civil Supplies and Consumer Protection)अन्न पुरवठा निरीक्षक (Food Supply Inspector) पदाच्या तीनशेहून अधिक जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार  विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. महाराष्ट्र अन्न विभागातील या पदांसाठी १३ डिसेंबर पासूनच अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे.

या भरतीद्वारे एकूण ३४५ गट क पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त जागा अन्न पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरीय लिपिक यांच्यासाठी आहेत. या पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येईल. महाराष्ट्र अन्न विभागाचे  अधिकृत वेबसाइट mahafood.gov.in. वरून अर्ज करता येतील. अर्ज करण्यासाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना १ हजार रुपये शुल्क भरावे लागेल. तर OBC, SC, ST आणि इतर राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये शुल्क भरावे लागते. दिव्यांग  उमेदवारांना  कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

हेही वाचा : विद्यार्थी पीएच.डी.करून काय दिवे लावणार आहेत ? अजित पवारांचा सवाल
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड सायन्समध्ये पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. यासोबतच त्याला मराठी भाषा अवगत असावी. अर्जदाराचे वय ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित वर्गाला वयोमर्यादेत सवलत मिळेल. 

महाराष्ट्र अन्न विभागातील या पदांवरील उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यासाठी बोलावले जाईल. दोन्ही टप्पे पार केल्यानंतरच निवड अंतिम होईल. निवड झालेल्या उमेदवाराला  पदानुसार वेतन मिळेल. अन्न पुरवठा निरीक्षक पदासाठी वेतन २९,२०० ते ९२,३०० रुपये एवढे आहे. तर उच्चस्तरीय लिपिक पदासाठी  रु. २५,५०० ते रु. ८१,१०० पर्यंत पगार असेल.