NMC च्या दोन बदलावरून वाद ; लोगोमध्ये भगवान धन्वंतरींचा फोटो तर 'इंडिया' चे केले 'भारत' 

भगवान धन्वंतरी यांचा फोटो गेल्या वर्षभरापासून लोगोमध्ये आहे

NMC च्या दोन बदलावरून वाद ; लोगोमध्ये भगवान धन्वंतरींचा फोटो तर 'इंडिया' चे केले 'भारत' 
NMC

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

NCERT च्या पुस्तकांमध्ये 'इंडिया' ऐवजी 'भारत' होण्याच्या वादावर नुकताच पडदा पडला. पण आता नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) च्या नवीन निर्णयामुळे हा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या अलीकडील दोन प्रमुख बदलांमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. NMC च्या अधिकृत लोगोमध्ये अलीकडेच दोन बदल करण्यात आले आहेत.  

पहिल्या बदलात 'इंडिया' (India) ऐवजी 'भारत' (Bharat) लिहिले आहे. तर दुसऱ्या बदलामध्ये आयुर्वेदाची देवता समजल्या जाणाऱ्या भगवान धन्वंतरी यांचा रंगीत फोटो लोगोमध्ये जोडण्यात आला आहे. मेडिकल कौन्सिलच्या लोगोमध्ये भगवान धन्वंतरींचा फोटो जोडण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या वादावर आयोगाचे म्हणणे आहे की, भगवान धन्वंतरी यांचा फोटो गेल्या वर्षभरापासून लोगोमध्ये आहे. 

हेही वाचा : CBSE दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येत्या १५ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू

मात्र, आता त्यांचा फोटो ब्लॅक अँड व्हाइट ऐवजी कलरफुल करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत सांगितले की, "भगवान धन्वतारी हे भारतासाठी वैद्यकीय क्षेत्रातील एक आयकॉन आहेत. एनएमसीच्या लोगोमध्ये फक्त चित्र रंगवण्यात आले आहे. भगवान धन्वंतरीचे चित्र असणे ही केवळ भारतासाठी अभिमानाची गोष्ट नाही तर देशाला आपल्या वारशाचा आणि संस्कृतीचा अभिमान वाटला पाहिजे. पण, आता NMC च्या नवीन निर्णयामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.