नर्सिंग प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

बी. एस्सी नर्सिंग सीईटी परीक्षेसाठी येत्या २६ मे पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.    

नर्सिंग प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क      

 एमएच-बी एस्सी नर्सिंग (MH B.Sc.Nursing CET-2023) या आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे State Common Entrance Test Cell बी. एस्सी नर्सिंग सीईटी परीक्षेसाठी येत्या २६ मे पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.                  

 कोरोनानंतर नर्सिंग अभ्यासक्रमाचे महत्त्व वाढले असून अनेक विद्यार्थीनी या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास इच्छुक असतात.१७ मे पासून प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली असेल येत्या २६ मे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने ऑनलाइन नोंदणी व नोंदणी अर्ज निश्चित करता येणार आहे. येत्या २७ मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी शुल्क भरता येणार आहे,असे राज्य सामायिक परीक्षा कक्षाचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी स्पष्ट केले आहे.इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी(www.mahacet.org)  या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.  

MH B.Sc.Nursing CET-2023 : अभ्यासक्रम आणि मार्किंग योजना

१) या परीक्षेत 100 एमसीक्यू  स्वरूपातील प्रश्न विचारले जाणार आहेत.त्यातील प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. 
२) सामायिक प्रवेश परीक्षेच्या अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी , नर्सिंग अटीट्युड या विषयांचा समावेश असेल.
 ३) प्रत्येक विषयाला २० गुण असतील.
४) ही परीक्षा इंग्रजी माध्यमातून घेतली जाईल.
५) परीक्षेसाठी दिड तासांचा कालावधी देण्यात येणार आहे.