PSI Result 2022 : पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, १० हजार विद्यार्थी पात्र

पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

PSI Result 2022 : पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, १० हजार विद्यार्थी पात्र
PSI Pre Exam Result 2022

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ चा पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) संवर्गाचा निकाल (PSI Result) जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मुख्य परीक्षेसाठी १० हजार ३८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. सर्वाधिक २ हजार ७०० विद्यार्थी पुण्यातील आहेत. मुख्य परीक्षा दि. ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पूर्व परीक्षेच्या निकालातून मुख्य परीक्षेसाठी पात्र करण्यात आलेल्या उभयलिंगी उमेदवारांना उभयलिंगी व्यक्तींच्या आरक्षणासंदर्भातील शासनाच्या धोरणाच्या अधीन राहून तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे.

PSI 2020 Result : पीएसआयचा रखडलेला निकाल अखेर जाहीर; EWS च्या ६५ पदांचा निकाल राखीव

उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या तसेच परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी व कटऑफ : https://mpsc.gov.in/downloadFile/english/7320

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता स्वीकारार्ह ठरतील, असेही आयोगाने म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD