'महावितरण' मध्ये मोठी भरती, 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज.. 

इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाइट www.mahadiscom.in वर अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २० जून आहे. 

'महावितरण' मध्ये  मोठी भरती, 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

Mahavitaran : महावितरण (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड) (MSEDCL recruitment) अंतर्गत विविध पदांच्या एकूण ८०० रिक्त जागांसाठी (Total 800 vacancies for various posts) भरती प्रक्रिया राबवली जात असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात (Application process starts) येत आहेत. त्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाइट www.mahadiscom.in वर अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २० जून आहे. 

ज्युनिअर असिस्टंट : महावितरण अंतर्गत ज्युनिअर असिस्टंटची 468 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे  मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून बीकॉम बीएमएस/ बीबीए पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांना एमएससीआयटी किंवा समकक्ष ज्ञान असणे गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवाराला पहिल्या वर्षी 19 हजार, दुसऱ्या वर्षी 20 हजार तर तिसऱ्या वर्षी 21 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

ग्रॅज्युएट इंजिनीअर : ग्रॅज्युएट इंजिनीअरची 281 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून इलेक्ट्रीकल किंवा सिवित इंजिनीअरिंगची पदवी घेणे आवश्यक आहे. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 22 हजार रुपये इतका पगार मिळेल.

ग्रॅज्युएट असिस्टंट : ग्रॅज्युएट असिस्टंटची 51 रिक्त पदे भरती जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून इलेक्ट्रीकत किंवा सिविल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेता असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 18 हजार इतका पगार दिला जाणार आहे

अधिकृत वेबसाइट www mahadiscom.in वर भरती प्रक्रियेचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. 20 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यान अर्ज फेटाळला जाईत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, जागांचा तपशील, अर्ज प्रक्रिया यांसारख्या सविस्तर माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या.