एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळणार? बळीराम डोळे पोलिसांच्या ताब्यात

बळीराम डोळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. डोळे हे सध्या डेक्कन पोलीस ठाण्यात असून आंदोलनावर ठाम आहेत.

एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळणार? बळीराम डोळे पोलिसांच्या ताब्यात
MPSC students Protest Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांमधील त्रुटी तसेच निकालांबाबत (MPSC Result) पुण्यात मंगळवारी विद्यार्थ्यांचे आंदोलन होणार होते. या आंदोलनाला (MPSC Students Protest) पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण त्यानंतरही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे (Maharashtra Congress) सरचिटणीस बळीराम डोळे (Baliram Doley) आंदोलनावर ठाम राहिल्याने त्यांना पुणे पोलिसांनी (Pune Police) मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले.

बळीराम डोळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. डोळे हे सध्या डेक्कन पोलीस ठाण्यात असून आंदोलनावर ठाम आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले, सर्व कार्य़क्रम, राजकीय आंदोलनांना पोलिसांकडून परवानगी दिली जाते. पण एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या आंदोलनाला परवानगी नाकारली जात आहे. परवानगी नाकारली असली तरी आम्ही आंदोलनावर ठाम आहोत.

व्यसनी शिक्षकांनो खबरदार! शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली मोठी घोषणा, लवकरच परिपत्रक काढणार

डेक्कन पोलीस ठाण्यात सध्या मी असून इथून बाहेर पडलो की आंदोलन करणारच आहोत. बालगंधर्व रंगमंदीर चौकात आम्ही एकत्रित जमणार असल्याचे डोळे यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे आता पुणे पोलीस काय भूमिका घेणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, डोळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्त अतुल लोंढे यांनी याचा निषेध केला आहे. ‘सर्व राजकीय आंदोलनाला परवानगी भेटत असताना गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने होत असलेल्या एमपीएससी आंदोलनाला का परवानगी नाकारली जात आहे. आज पुण्यात होत असलेलं विद्यार्थी आंदोलन होऊ नये म्हणून आमच्या बळीराम डोळे यांना सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. हे लोकशाहीच्या विरोधात आहे. याचा आम्ही निषेध करतो,’ असे ट्विट लोंढे यांनी केले आहे.

गट ब व गट क ही परीक्षा एकत्रित झाल्याने त्याचा कटऑफही एकच असावा, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. त्याचप्रमाणे सर्व परीक्षा ऑफलाईन कराव्यात, टायपिंग कौशल्य चाचणीबाबतही आक्षेप घेत विद्यार्थी आंदोलन करत आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo