आरटीईच्या अर्जांनी ओलांडला 55 हजारांचा टप्पा; पुण्यातून 12 हजार अर्ज 

शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत 55 हजाराहून  पालकांनी आपल्या पाल्याचा आरटीई प्रवेशाचा अर्ज भरला.

आरटीईच्या अर्जांनी ओलांडला 55 हजारांचा टप्पा; पुण्यातून 12 हजार अर्ज 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

RTE NEWS: शिक्षण हक्क कायद्यानुसार (Right to Education Act)25 टक्के आरक्षित जागांवर आरटीई प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज (RTE admission online application)भरण्यास सुरूवात झाली असून दोन दिवसातच 54 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.त्यात पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 12 हजार अर्ज आले असून सिंधूदूर्ग जिल्ह्यातून सर्वात कमी 13 अर्ज प्राप्त झाले आहेत.मात्र,गेल्या महिन्यात राबवलेल्या प्रवेश प्रक्रियेचा विचार करता सध्या इंग्रजी मध्यमाच्या शाळांमधील (English medium school) जागांसाठी नव्याने राबवल्या जात असलेल्या प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राज्यातील 9 हजार 136 शाळांमधील 1 लाख 2 हजार 248 जागांसाठी शुक्रवारपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत 55 हजाराहून अधिक पालकांनी आपल्या पाल्याचा ऑनालाईन अर्ज भरला .त्यामुळे शासकीय,अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांएवजी पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अधिक पसंती देत आहेत.त्यामुळेच अवघ्या दोन दिवसात ५० हजारांचा टप्पा पूर्ण झाला. त्यात पुढील काही दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

आरटीई प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक जागा असतात.या वर्षी 15 हजार 606 जागा असून त्यासाठी शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत 12 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले.तर अहमदनगर व अमरावती जिल्ह्यात दीड हजार, छत्रपती सांभाजीनगर जिल्ह्यात सुमारे 3 हजार,बुलढाणा जिल्ह्यात 1 हजार 107, मुंबईमध्ये 1 हजार 400, नागपूरमध्ये 4 हजार 830, नांदेड जिल्ह्यात 1 हजार 900, नाशिकमध्ये 3 हजार, रायगड मध्ये सुमारे 2 हजार, ठाण्यातून सुमारे साडेचार हजार तर यवतमाळ म्हणून 1 हजार 161 अर्ज आले आहेत.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेकरिता पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.पालकांना येत्या 31 मे पर्यंत अर्ज भरता येणार आहे.

--------------------------------------------