Breaking News: बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार; बोर्डाची अधिकृत घोषणा

राज्य मंडळाने निकालाची तारीख व वेळ जाहीर केली आहे. विद्यार्थी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन निकाल पाहू शकतात.

Breaking News: बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार; बोर्डाची अधिकृत घोषणा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

HSC SSC Board: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये (Feb.- March 2024)घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल (12th Exam Result) मंगळवारी 21 मे रोजी जाहीर होणार आहे. राज्य मंडळातर्फे याबाबतचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. (शिक्षण विषयक बातम्या पाहण्यासाठी Eduvarta ला फॉलॉ करा)

राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. परीक्षा संपून सुमारे अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला.त्यामुळे निकाल केव्हा लागणार?  याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वी निकालाबाबत अफवा पसरल्या होत्या.त्यावर दहावी व बारावीचे निकाल मे महिन्यातच जाहीर केले जातील. असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले होते.त्यानुसार निकालाची तारख जाहीर झाली आहे. 

बारावीचा निकाल 19 मे पर्यंत जाहीर होणे अपेक्षित होते. परंतु, अद्याप निकाल जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची उत्कंठा वाढली होती. अखेर राज्य मंडळाने निकालाची तारीख व वेळ जाहीर केली आहे. विद्यार्थी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन निकाल पाहू शकतात.

-----------------------

१. mahresult.nic.in
२. http://hscresult.mkcl.org
३. www.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
५. www.tv9marathi.com
६. http://results.targetpublications.org