Pune News : कृषी महाविद्यालय बनणार ‘एनर्जी हब’; देशातील पहिलाच प्रयोग

नूतनीकरणीय उर्जा निर्मित करण्याच्या दृष्टीने महात्मा फुले कृषि विद्यापीठ व महाराष्ट्र उर्जा विकास संस्था (मेडा) यांच्यामध्ये सोमवारी अक्षय उर्जा सामंजस्य करार करण्यात आला.

Pune News : कृषी महाविद्यालय बनणार ‘एनर्जी हब’; देशातील पहिलाच प्रयोग

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय (Agriculture College) भविष्यात एनर्जी हब बनविण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल टाकण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या आवारात जवळपास दोन एकरांहून अधिक जागे सौर ऊर्जा प्रकल्प (Solar Energy Project) साकारण्यात येणार आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून वाहनांसाठी स्मार्ट चार्जिंग स्टेशन (Smart Charging Station) उभारण्यात येणार आहेत. एखाद्या कृषी महाविद्यालयाकडून राबविण्यात येणारा हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याने याबाबत उत्सुकता वाढली आहे.

नूतनीकरणीय उर्जा निर्मित करण्याच्या दृष्टीने महात्मा फुले कृषि विद्यापीठ व महाराष्ट्र उर्जा विकास संस्था (मेडा) यांच्यामध्ये सोमवारी अक्षय उर्जा सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील व ‘मेडा’च्या महासंचालिका डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.

धक्कादायक : शिक्षणाधिकाऱ्याची बनावट सही करून शाळेने मिळवली बोर्डाची मान्यता

मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेकडून सौर ऊर्जेचे सर्व तंत्रज्ञान महाविद्यालयाला उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे तंत्रज्ञान आयआयटीने विकसित केले असून प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदाच पुण्यातील कृषी महाविद्यालयात त्याची उभारणी करून ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी महाविद्यालयाकडे जवळपास ८७ गुंठे जागेची मागणी करण्यात आली आहे.

पुढील पाच वर्षात इलक्ट्रिक वाहनांची संख्या विचारात घेऊन नूतनीकरणीय उर्जेवर आधारित इलेक्ट्रिक वाहनांचे स्मार्ट चार्जिंग केंद्र सुरु होणार आहे. त्यासाठी करण्यात आलेला करार हा पुढील २५ वर्षांसाठी नियोजित असून सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर कार्यरत राहणार आहे. प्रकल्पाची उभारणी, तांत्रिक सहाय्य व देखरेख ‘आयआयटी’कडून केले जाणार आहे. कुलगुरू डॉ. पाटील यांनी देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच करार असल्याचे नमूद केले.

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर व मेडा चे अतिरिक्त महासंचालक पंकज तगलपल्लीवर, उपसंचालक विजय कोते, कृषि महाविद्यालयाचे विभागप्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD