शिक्षकांची होणार ऑनलाईन हजेरी! मंत्री केसरकरांनी दिले संकेत

जिल्हा परिषद कोल्हापूर (ZP Kolhapur) आयोजित प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शनिवारी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले. यावेळी केसरकर बोलत होते.

शिक्षकांची होणार ऑनलाईन हजेरी! मंत्री केसरकरांनी दिले संकेत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

भविष्यात शिक्षण विभागामध्ये (Education Department) वेगवेगळ्या प्रकारचे बदल होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी (Students) केंद्रबिंदू मानून पुढची पिढी घडविणे ही जबाबदारी आपण उत्स्फूर्तपणे पार पाडली पाहिजे. ऑनलाईन हजेरी सारख्या बदलांना आणि सकारात्मक आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी सांगितले.

 

जिल्हा परिषद कोल्हापूर (ZP Kolhapur) आयोजित प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शनिवारी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले. यावेळी केसरकर बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

शिक्षक बिघडण्याच्या मार्गावर, मोदीजी कामाला लावणार! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य 

शिक्षकांनी 'चॉईस' पोस्टिंग घेऊन ती शाळा आपली माना. त्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी किंबहुना त्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करा, असे आवाहन याप्रसंगी केसरकर यांनी शिक्षकांना केले. कोल्हापूर जिल्ह्यात नेहमी गुणवतेच्या बाबतीत स्पर्धा पाहायला मिळते. स्कॉलरशिप परीक्षेत सर्वाधिक मुले ही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचा अभिमान आहे. येथील चार शिक्षकांची निवड राज्यस्तरीय पुरस्कारासाठी झाली आहे. त्यांच्यासह जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा सन्मान करणे ही विशेष आनंदाची बाब आहे, असे केसरकर म्हणाले.

 

कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, शिक्षक आमदार जयंत आसगवकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा नियोजन सदस्य अमित कामत, प्राथमिक शिक्षण अधिकारी, आदींसह जिल्ह्यातील प्रमुख नेते, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, आजी-माजी शिक्षक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j