SPPU News : दक्षिण कोरियातील जेजू नॅशनल विद्यापीठाशी महत्वपूर्ण करार

कराराअंतर्गत विद्यार्थी व प्राध्यापकांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे, नवकल्पना व नवप्रकल्पांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

SPPU News : दक्षिण कोरियातील जेजू नॅशनल विद्यापीठाशी महत्वपूर्ण करार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याला चालना देण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. विद्यापीठाने दक्षिण कोरियातील (South Korea) जेजू नॅशनल विद्यापीठाशी (Jeju national University) रविवारी (दि. ८) शैक्षणिक आणि संशोधनास चालना देण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार केला.

 

कराराअंतर्गत विद्यार्थी व प्राध्यापकांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे, संशोधनामध्ये सक्रीय सहभाग, संयुक्त परिषदा आणि कार्यशाळांचे आयोजन, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, स्कील बेस अभ्यासक्रम, सांस्कृतिक देवाणघेवाण, नवकल्पना व नवप्रकल्पांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

शिक्षणाला हवा बुस्टर डोस; २०३० चे लक्ष्य साधण्यासाठी साडे चार कोटी शिक्षकांची गरज

 

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्यचे संचालक डॉ. संजय ढोले, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्कचे डॉ. राजेंद्र जगदाळे आदी उपस्थित होते. तसेच जेजू नॅशनल विद्यापीठातर्फे किम इल व्हान, प्रेसिडेंन्ट, किम बेई संग, डीन, बिझनेस मॅनेजमेंट, यांग हयुक जून, संचालक, हांन जेन ई, संचालक, आंतरराष्ट्रीय केंद्र हे उपस्थित होते.

 

डॉ. संजय ढोले यांनी विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासाचे तर डॉ. विजय खरे यांनी विद्यापीठाच्या आंतराष्ट्रीय केंद्राविषयी आणि जेजू विद्यापीठाच्या हय् सुक यांनी सादरीकरण केले. दोन्ही संस्था त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी आणि संशोधन आणि नाविन्यपूर्णतेसाठी प्रख्यात आहेत. या करारान्वये दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांसाठी असंख्य संधी निर्माण करेल आणि ज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यामध्ये महत्वपूर्ण योगदान देईल.

 

विश्वस्तरीय शैक्षणिक सहकार्याच्या दिशेने पाऊल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि जिजू नॅशनल विद्यापीठ यांचेमधील सामंजस्य कराराद्वारे रिन्युएबल एनर्जी, कार्बन न्युट्रल परिसर, एक पृथ्वी एक कुटूंब' या ध्येय घेवून दोन्ही विद्यापीठांमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापक देवाणघेवाण, उत्कृष्ट संशोधन प्रकाशन, संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सदर करार 'विश्वस्तरीय शैक्षणिक सहकार्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरेल. "

  • डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरु

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k