SPPU : विद्यापीठाचा पंचवार्षिक आराखडा तयार होतोय, तुम्हीही करा सुचना

विद्यार्थी व पालकांच्या योग्य सूचनांचा २०२४ ते २०२९ च्या आराखड्यात समावेश करण्यात येईल, असेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

SPPU :  विद्यापीठाचा पंचवार्षिक आराखडा तयार होतोय, तुम्हीही करा सुचना
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा (SPPU) पंचवार्षिक बृहत् आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. यात विद्यार्थी, पालक, प्राचार्य, शिक्षक, संस्थाचालक आणि लोकप्रतिनिधी या सर्वांना आपला सहभाग नोंदवता येणार आहे. आपल्या सुचना ऑनलाईन माध्यमातून पाठविण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. (Five Year Master Plan of Savitribai Phule Pune University)

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

विद्यापीठाच्या शैक्षणिक संलग्नता कक्षातर्फे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, (University Act) २०१६ मधील कलम १०७ तरतुदींनुसार विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत् आराखडा सन २०२४-२५ ते २०२९-३० तयार करण्याचे काम सुरू आहे. हा आराखडा तयार करत असताना प्रत्येक ठिकाण किंवा प्रदेशानुसार सामाजिक व आर्थिक गरजांचा, नोकरीच्या उपलब्ध संधींचा व उद्योगांच्या आवश्यकतांचा अभ्यास करून नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम व विद्याशाखा यांचा समावेश करण्याच्या अनुषंगाने सर्व स्थरातील घटकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत.

हेही वाचा : महात्मा फुलेंचा वारसा पुढे घेऊन जाणारा आदर्श शिक्षक

यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पंचवार्षिक बृहत् आराखडा सर्वेक्षण सन २०२४ ते २०२९ या शीर्षकांतर्गत ऑनलाईन सर्व्हे अर्ज तयार करण्यात आला आहे. आपल्या योग्य सूचनांचा २०२४ ते २०२९ च्या आराखड्यात समावेश करण्यात येईल, असेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

ऑनलाईन सर्व्हे अर्ज - https://bcud.unipune.ac.in/PerspectivePlan/Home/SurveyDetails