आता मृत्यूपेक्षा सुंदर काहीच नाही! नोकरीवरून काढलेल्या प्राध्यापिकेला हवे इच्छामरण

पार्वती कुमारी या अंध असून त्या दिल्ली विद्यापीठाच्या सत्यवती कॉलेज मध्ये प्राध्यापिका होत्या. नुकतेच त्यांच्या सहित इतर ६ प्राध्यापकांनाही महाविद्यालयाने नोकरीवरून काढून टाकले आहे.

आता मृत्यूपेक्षा सुंदर काहीच नाही! नोकरीवरून काढलेल्या प्राध्यापिकेला हवे इच्छामरण
Dr Parvati Kumari

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

काही दिवसांपूर्वी तथागत अवतार तुलसी या IIT मुंबईतील प्राध्यापकाला नोकरीवरून काढून टाकल्याचे प्रकरण सोशल मीडियावर (Social Media) बरेच व्हायरल झाले होते. सध्या असेच आणखीन एक प्रकरण सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. डॉ. पार्वती कुमारी (Dr Parvati Kumari) या दिल्ली विद्यापीठातील (Delhi University) प्राध्यापिकेला  नोकरी वरून काढून टाकण्यात आले आहे, आता या प्राध्यापिका इच्छा मरणाची मागणी करत आहेत. पार्वती कुमारी यांची फेसबुक वरील ही पोस्ट सध्या बरीच व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे इतर प्राध्यापकांनीही '#भागी_दार कौन'  नावाने  फेसबुक वर ट्रेंड सुरु केला आहे.

 

पार्वती कुमारी या अंध असून त्या दिल्ली विद्यापीठाच्या सत्यवती कॉलेज मध्ये प्राध्यापिका होत्या. नुकतेच त्यांच्या सहित इतर ६ प्राध्यापकांनाही महाविद्यालयाने नोकरीवरून काढून टाकले आहे. असे करून महाविद्यालयाने आपल्यावर अन्याय केला आहे, असा आरोप पार्वती कुमारी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉल वर के पोस्ट लिहिली आहे. "अब मृत्यु से सुंदर कुछ भी नहीं है, मुझे इच्छा मृत्यु दी जाए," या मथळ्याखाली पार्वती कुमारी यांनी एक पत्र लिहिले आहे.

 

भावी शिक्षकांसाठी मोठी बातमी; सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

"माझ्या आयुष्याचा प्रकाश म्हणजे ही नोकरी  होती. केवळ महाभारतातच चीरहरण झाले होते असे नाही,  तर आजही माझ्यासोबत खूप भयंकर घटना घडल्या आहेत. माझ्याकडून माझी नोकरी हिरावून घेतली गेली. आयुष्यातील अंधत्व पुन्हा गहिरे झाले आहे. आत्महत्या करण्याचा विचार अनेक वेळा आला, पण मला इच्छामरण हवे आहे, कृपया मला मदत करा", असे पार्वती कुमारी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

 

त्यांनी पुढे लिहिले आहे कि, "१० वी मध्ये शिकत असताना  माझी दृष्टी गमावल्यानंतर मी ब्रेलमध्ये बारावी केली. डीयू आयपी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन, दौलत राम कॉलेजमधून एमए, जेएनयूमधून एमफिल आणि पीएचडी. माझी जेआरएफ सामान्य श्रेणीत आहे. पण आज मला नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे. आणि त्याच्या जागी एमए आणि नेट उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थ्याने घेतली. हा माझा खून आहे, फक्त खून आहे. मी पार्वती, मी भारतातील प्रत्येक नागरिकाला आवाहन करते  की, आता माझे रूपांतर जिवंत प्रेतात झाले आहे. सत्यवती  कॉलेजमधून बाहेर काढल्यानंतर मी प्रत्येक क्षणी मरत आहे."

 

"आता माझी ही वेदना कायमची संपुष्टात यावी अशी माझी इच्छा आहे. देवाने माझी दृष्टी हिरावून घेतली तेव्हा मला वाटले की आयुष्य कसे तरी जगेन. विचारवंतांच्या समाजातही माझ्यासारख्या दुर्दैवी जीवाला  पायदळी तुडवले जाईल हे मला फारसे माहीत नव्हते. मी निराश आहे. पुन्हा आंधळी  झाल्यासारखे वाटते. आंधळ्यांच्या डोळ्यात गरम तेल ओतले आहे. देवा, कुठे गेला तुझा न्याय? आमच्यावर जरा दया कर. तुला  आंधळ्यांचा संघर्ष माहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी संघर्ष करत आहे. देवाने आपल्या सर्व इच्छा आधीच दाबून ठेवल्या होत्या, ही  घटना  मानवतेला लाजवेल. आपला समाज अपंगांच्या बाबतीत संवेदनशील नाही. पुरुषांचे अंधत्व आणि स्त्री अंधत्व यातही फरक आहे. आम्हाला दोनदा फटका बसला आहे. समाजात पुरुषांना विशेषाधिकार आहेत पण स्त्रियांना?" अशा भावना पार्वती कुमारी यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j