स.प. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची लूट ? शुल्क वसूल करूनही मिळेनात सुविधा

महाविद्यालयातील स्वच्छतागृहांची नियमित सफाई केली जात नाही. महाविद्यालयामधील  अनेक वर्गांची दुरावस्था झाली असून तेथेही साफसफाई होत नाही.  महाविद्यालय आवारात तसेच पदवीधर विभागासाठी पुरेशा पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिलेली नाही. महिला स्वच्छतागृहामध्ये कचरापेटी व सॅनिटरी नॅपकिनची सोय नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

स.प. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची लूट ? शुल्क वसूल करूनही मिळेनात सुविधा
स.प.महाविद्यालयात सुविधांचा अभाव असल्यामुळे सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने महाविद्यालयात आंदोलन करताना विद्यार्थी .

पुणे शहरातील नामांकित महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या स.प.महाविद्यालयात (s.p. college) सुविधांचा अभाव असल्यामुळे सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (abvp) वतीने महाविद्यालयात आंदोलन करण्यात आले. कॉलेज डेव्हलपमेंट शुल्काच्या (college development fee) नावाखाली विद्यार्थ्यांकडून सुमारे चार ते साडेचार हजार रुपये शुल्क वसूल करूनही मुलभूत सुविधा दिल्या जात नाही. एकप्रकारे ही विद्यार्थ्यांची लूट आहे,त्यामुळे   'अभाविप'ने आंदोलनाचा पवित्र घेतला.  

  महाविद्यालयातील स्वच्छतागृहांची नियमित सफाई केली जात नाही. महाविद्यालयामधील  अनेक वर्गांची दुरावस्था झाली असून तेथेही साफसफाई होत नाही.  महाविद्यालय आवारात तसेच पदवीधर विभागासाठी पुरेशा पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिलेली नाही. महिला स्वच्छतागृहामध्ये कचरापेटी व सॅनिटरी नॅपकिनची सोय नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.                 

महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या परिसरात पाणी साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असून त्यामुळे विद्यार्थ्यांना डेंग्यू सारखे आजार होत आहेत. तसेच महाविद्यालयाच्या प्रमुख प्रवेशद्वारासमोरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना ये- जा करताना त्रास होतो. याबाबतचे निवेदन अभाविप तर्फे काही महिन्यांपूर्वी महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आले होते. परंतु, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे अभाविपतर्फे आंदोलन करण्यात आले.

------------------------------------------------------

" स.प.महाविद्यालय प्रशासनाकडून डेव्हलपमेंट शुल्काच्या नावाखाली सुमारे चार ते साडेचार हजार रुपये शुल्क घेतले जातात. परंतु, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना परिसरातील डासांमुळे डेंग्यू झाला होता. पिण्याचे पाणी स्वच्छतागृह या साध्या सुविधाही महाविद्यालय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत नाही त्यामुळे सोमवारी अभाविपतर्फे आंदोलन करण्यात आले."

- जयेश कोळी, अभाविप, मध्य पुणे नगर मंत्री.   

-------------------------------------------

"महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास कटीबद्ध आहे. येत्या आठवड्याभरात किरकोळ असुविधा दूर केल्या जातील.तर इतर सुविधा येत्या महिन्याभरात उपलब्ध करून दिल्या जातील."

- डॉ.सुनील गायकवाड, प्राचार्य, स.प.महाविद्यालय,