प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कुलचा ‘ग्रॅज्युएशन डे' उत्साहात साजरा

काही मुले अभ्यासात हुशार तर काही खेळात, काही नृत्यात पारंगत तर काही गायनात कुशल. असे विविध गुण असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या कलागुणांवर आधारित टॅसल दिले गेले.

प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कुलचा ‘ग्रॅज्युएशन डे' उत्साहात साजरा
Priyadarshini Pune Police Public School

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सतत आई-वडिलांच्या कुशीत राहणारे, घरच त्यांचे विश्व असलेले छोटी छोटी मुले प्री-प्रायमरी शाळेत (Pre Primary School) जाऊ लागतात. नवनवीन मित्र मैत्रिणी, शिक्षक, शाळा असे त्यांचे स्वतःचे विश्व तयार होते. मग 'ग्रॅज्युएशन डे' (Graduation Day) हा एक महत्वाचा टप्पा येतो. ग्रॅज्युएशन कॅपवरील टॅसलपासून ते प्रथमच ‘पॉम्प अँड सर्कमस्टन्स’ चे औपचारिक संगीत ऐकण्यापर्यंत, पदवीप्रदान हा एक खास क्षण ठरतो. हा मौल्यवान क्षण आपल्या विद्यार्थ्यांनाही अनुभवता यावा म्हणून पुण्यातील प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कुलने सिनिअर केजीतील मुलांसाठी 'ग्रॅज्युएशन डे' चे आयोजन केले होते. (Priyadarshini Pune Police Public School Graduation Day)

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

ग्रॅज्युएशन कॅप, टॅसल आणि सॅश घातलेली चिमुकली मुले, प्री-स्कुल सर्टिफिकेट घेताना त्यांच्या चेहऱ्यावरील काहीसा गोंधळ, आनंद आणि आपले आई-बाबा आपल्याला पाहत आहेत, याचा अभिमान असे मिश्रित हावभाव, विद्यार्थ्यांइतकेच उत्साही शिक्षक असे विलोभनीय वातावरण यावेळी शाळेत दिसत होते. यावेळी प्री-प्रायमारी स्कुल कडून सिनिअर केजी च्या ७० विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली.

काही मुले अभ्यासात हुशार तर काही खेळात, काही नृत्यात पारंगत तर काही गायनात कुशल. असे विविध गुण असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या कलागुणांवर आधारित टॅसल दिले गेले. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्पिता दीक्षित यांच्या हस्ते मुलांना सर्टिफिकेट देण्यात आले. यावेळी मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आनंद लुटला.

याविषयी बोलताना शाळेच्या प्री-प्रायमरी समन्वयक अस्मिता रायकर म्हणाल्या, "आमची मुले पूर्व प्रथमिक शाळेतून प्राथमिक शाळेत जात आहेत. हा त्यांच्या शैक्षणिक आयुष्यातला पहिला टप्पा आहे. ही बाब आम्हाला मुलांसोबत साजरी करायची होती, म्हणून हा प्रयत्न केला. आमच्या छोट्या मित्रांनी आमचा हा प्रयत्न यशस्वी करून दाखवला."