Student Helping Hands News : 'स्टूडंट हेल्पिंग हँडस'ची दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत

संस्थेकडे नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थ्यांना सोमवारपासून दोन वेळचे जेवण मे महिन्यापर्यंत मोफत दिले जाणार आहे.

Student Helping Hands News : 'स्टूडंट हेल्पिंग हँडस'ची दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  : 

Student Helping Hands News : राज्यात या वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) पुण्यात वेगवेगळया महाविद्यालयात शिकत असणार्‍या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी 'स्टूडंट हेल्पिंग हँडस' (Student Helping Hands) ने पुढाकार घेतला आहे. संस्थेकडे दुष्काळग्रस्त 300 विद्यार्थ्यांची नोंदणी आतापर्यत केली आहे. या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने मदत केली जाणार आहे. 

संस्थेकडे नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थ्यांना सोमवारपासून दोन वेळचे जेवण मे महिन्यापर्यंत मोफत दिले जाणार आहे. तसेच सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने 50 विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे. त्याच बरोबर इतर विद्यार्थ्यांचीही व्यवस्था केली जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अँड. कुलदीप आंबेकर यांनी सांगितले. 

हेही वाचा : देवगड समुद्रकिना-यावर पुण्यातील चार विद्यार्थ्यांचे मृतदेह

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते संग्राम कोते पाटील यांनीही या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, लवकरच विद्यार्थ्यांच्या या अडचणी शासन स्तरावर मांडून विद्यार्थ्यांना दिलासा देऊ. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत चर्चा करून विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार असल्याचे आंबेकर यांनी सांगितले.   

विद्यार्थ्यांनी विविध मागण्या केल्या आहेत, त्यामध्ये दुष्काळ संपेपर्यत पुढील 6 महिने मोफत मेस द्यावी, दुष्काळातील विद्यार्थीसाठी भांडे तत्वावर शासनाने 100 क्षमतेचे मूला मूलींचे वसहतीगृह सुरू करावे, कमवा व शिका यांच्या रक्कमेत वाढ करावी. सरसकट विद्यार्थ्यांच्या हाताला अर्धवेळ काम द्यावे, अत्महत्याग्रस्त शेतकरी,एकल पालक,अनाथ विद्यार्थी यांची संपुर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावी. दुष्काळग्रस्त विद्यार्थीची परीक्षा शुल्क माफ करावी, विद्यापीठे व उच्चतंत्र विभाग यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची माहीती संकलित करावी, या व आदी मागण्यासाठी अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार असल्याचे आंबेकर यांनी सांगितले.