खाजगी म्हणजे गुणवता हे मिथक  : प्राचार्य अनिल अडसूळ

अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेतर्फे महात्मा फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या व्याख्यानमालेत 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व बहुजन समाज' या विषयावर ते बोलत होते.

खाजगी म्हणजे गुणवता हे मिथक  : प्राचार्य अनिल अडसूळ
School Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला (NEP 2020) जमिनी वास्तवाचे भान नाही. त्यामुळे धोरण व सद्यस्थितीत विसंगती आहे. खाजगीकरण म्हणजे गुणवता हे मिथक आहे. अपवादाने नियम सिद्ध होत नाही, असे मत सेंट व्हिन्सेंट कॉलेजचे (Saint Vincent College) प्राचार्य डॉ. अनिल अडसूळ (Dr. Anil Adsul) यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेतर्फे महात्मा फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या व्याख्यानमालेत 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व बहुजन समाज' या विषयावर ते बोलत होते. यावेळी अनंतराव थोपटे कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रसन्न कुमार देशमुख म्हणाले, पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण उत्तम आहे पण सामान्यांना परवडत नसेल तर त्याचा उपयोग काय कागदावर धोरण छान दिसते, अंमलबजावणी मात्र कठीण आहे. संस्थानी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी निधी कसा उभा करायचा याचे उत्तर धोरणात नाही.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

पहिल्या पुष्पात बोलताना अॅड. संतोष मस्के यांनी 'भारतीय संविधान व शिक्षण हक्क यावर आपले विचार मांडले तर अॅड. सुधीर निरफराके यांनी अध्यक्षीय समारोप केला. व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प पुना कॉलेजचे प्राचार्य डॉ. अन्वर शेख यांनी गुंफले. ‘अल्पसंख्यांकांच्या शिक्षण समस्या' यावर बोलताना म्हणाले की, "मुस्लिम समाजाला पुढे नेण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मुस्लिम तरुणीचा विज्ञान तंत्रज्ञान, शिक्षणाकडे येण्याचा ओढा वाढत आहे. हे स्वागतार्ह आहे.

शिष्यवृत्ती बंद करणे प्रतिकूल सामाजिक परिस्थिती हे शिक्षणात अडथळे आहेत. महाराष्ट्रातील मुस्लिम पालक मुलांना आधुनिक शिक्षणात पाठवतात व बिहार, उत्तर प्रदेशातून आलेले स्थलांतरित मुस्लिम कामगार मुलांना उर्दू माध्यमात प्रामुख्याने पाठवतात, असेही शेख यांनी सांगितले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना शिक्षण हक्क सभेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. शरद जावडेकर म्हणाले, ‘कॉम्पोझिट कल्चरल सुरक्षित राहिले तरच हा देश टिकेल. पाठ्यपुस्तकातील मोडतोड देशाला ज्ञानसत्ता मिळवून देणार नाही."