बारावीनंतर भारतीय लष्करात जाण्याची संधी; टेक्निकल एंट्री स्कीममध्ये घेता येणार प्रवेश

प्रवेशासाठी उमेदवारांना JEE Mains २०२३ अनिवार्य आहे. याशिवाय, उमेदवाराने १२वी PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) या विषयांत किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेला असावा.

बारावीनंतर भारतीय लष्करात जाण्याची संधी; टेक्निकल एंट्री स्कीममध्ये घेता येणार प्रवेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 

भारतीय लष्करात (Indian Army) भरती होऊन देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्कराकडून टेक्निकल एंट्री स्कीमसाठी /TES (10+2) 2024 साठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया १३ ऑक्टोबर सुरू होणार आहे. दि. १२ नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. (Technical Entry Scheme)

 

प्रवेशासाठी उमेदवारांना JEE Mains २०२३ अनिवार्य आहे. याशिवाय, उमेदवाराने १२वी PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) या विषयांत किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेला असावा. तांत्रिक प्रवेश योजना ५१ साठी अर्ज करताना, उमेदवारांचे किमान वय १६.५ वर्षांपेक्षा जास्त आणि कमाल वय १९.५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तपशीलवार अधिसूचना जारी केल्यानंतर उमेदवारांना पात्रता आणि निकषांबद्दल तपशीलवार माहिती मिळू शकेल.

RTE शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम सहा आठवड्यात द्या! उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

 

भारतीय सैन्यात TES 51 एंट्री 2024 साठी उमेदवार फक्त ऑनलाइन माध्यमातून अर्ज भरू शकतील. अर्जाचा फॉर्म १३ ऑक्टोबर रोजी भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट  https://joinindianarmy.nic.in/ वर उपलब्ध करून दिला जाईल.

 

यामध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. या भरतीमध्ये सामील होण्यासाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांना विनामूल्य अर्ज करता येतील, अशी सूचना लष्कराकडून करण्यात आली आहे. दरम्यान, यामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीची पदवी घेता येते. लष्करातील तांत्रिक, अभियांत्रिकी सेवांमध्ये या विद्यार्थ्यांना संधी मिळते. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k