वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षेत घोटाळा? परीक्षा केंद्र ‘मॅनेज’ करून गुण वाढविल्याचे पुरावे

वैद्यकीय शिक्षण विभागाने पाच हजार १५५ जागांसाठी नुकतीच ऑनलाईन परीक्षा घेतली. एका खासगी संस्थेला परीक्षा घेण्याचे काम देण्यात आले होते.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षेत घोटाळा? परीक्षा केंद्र ‘मॅनेज’ करून गुण वाढविल्याचे पुरावे
Medical Education Department Exams

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने (Medical Education Department) काही दिवसांपूर्वी पाच हजारांहून अधिक पदभरतीसाठी (Recruitment) घेण्यात आलेल्या परीक्षेत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप स्पर्धा परीक्षा (Competitive Examination) समन्वय समितीने केला आहे. परीक्षा केंद्र (Examination Centres) मॅनेज करून गुण वाढविल्याचा दावा समितीने केला असून विद्यार्थ्यांच्या (Students) नावांसह त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा गौप्यस्फोटही समितीने केला आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाने पाच हजार १५५ जागांसाठी नुकतीच ऑनलाईन परीक्षा घेतली. विभागाच्या शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथीक, महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागांतील गट क परिचर्या व तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदांसाठी ही परीक्षा १२ ते २० जून या कालावधीत राज्यभरातील विविध सेंटरवर घेण्यात आली. एका खासगी संस्थेला परीक्षा घेण्याचे काम देण्यात आले होते.

उत्तरपत्रिका तपासण्यास विद्यापीठाकडून उशीर का होतोय? गंभीर माहिती आली समोर

परीक्षेदरम्यान लातूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रे मॅनेज झाल्याचा संशय असल्याचे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ट्विट करत म्हटले आहे. तसेच पुरावे आमच्याकडे आले आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागासोबत आम्ही सर्व माहिती शेअर करू. आम्ही संपूर्ण सहकार्य करू. डीएमईआरच्या अधिकाऱ्यांना आमचे आवाहन आहे, याबाबत तात्काळ पावले उचलावीत, असे समितीने ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनाही टॅग करण्यात आले आहे.

महत्वाची बातमी : बोर्डाला काढावी लागणार दहावी-बारावीची मेरिट लिस्ट

याविषयी ‘एज्युवार्ता’शी बोलताना समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी सांगितले की, परीक्षेसाठी खासगी संस्थेला नेमण्यात आले होते. काही खासगी सेंटरवरही परीक्षा घेण्यात आली. ही सेंटर मॅनेज झाली होती. काही विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांची नावे व गुण वाढविल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. ते पुरावे घेऊन आम्ही गिरीश महाजन यांची भेट घेणार असल्याचे कवठेकर यांनी स्पष्ट केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2