रद्द... रद्द ...बार्टी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षा अखेर रद्द ; पुन्हा नव्याने परीक्षा घेणार 

येत्या जानेवारी महिन्यात पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे.

रद्द... रद्द ...बार्टी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षा अखेर रद्द ; पुन्हा नव्याने परीक्षा घेणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

बार्टी, सारथी, महाज्योती (Barti , Sarathi , Mahajyoti) या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी (fellowship) घेण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ झाल्याने ही परीक्षा रद्द (Exam cancelled) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या जानेवारी महिन्यात पुन्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)सेट विभागातर्फे (set department) परीक्षा घेतली जाणार आहे.विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला,असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

राज्य शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी दोन दिवसांपूर्वी परीक्षा घेण्यात आली.पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेत 2019 झालेल्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी विद्यार्थ्यांना देण्यात आली.मात्र, त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली.त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मंगळवारी सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सारथीचे वरिष्ठ अधिकारी आणि महाज्योती संस्थेचे प्रमुख ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

हेही वाचा : नव्या व दूर्लक्षित अभ्यासशाखांना गवसणी घालणारे 'मराठी भाषा विद्यापीठ' : डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांची विशेष मुलाखत

फेलोशीप परीक्षेसाठी सेट विभागाकडून अनावधानाने 2019 ची सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आले.त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.आता येत्या जानेवारी महिन्यात पुन्हा परीक्षा घेण्याचे नियोजन आहे.त्याबाबतची अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे,असेही सूत्रांनी सांगितले.