स्वररंग २०२३ : विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात कोण मारणार बाजी?

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वररंग २०२३ : विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात कोण मारणार बाजी?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) विद्यार्थी विकास मंडळ आणि विभागनिहाय महाविद्यालयांच्या 'स्वररंग २०२३' (Swararang 2023) हा युवक महोत्सव (Youth Festival) नुकताच पार पडला. या महोत्सवामध्ये विविध गटांत पहिले तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना आता विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. हा महोत्सव दि. ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. (Savitribai Phule Pune University Youth Festival)

 

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय युवक महोत्सवांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने विजयी झालेल्या महाविद्यालयांना दि. ६ ऑक्टोबरपर्यंत आपली प्रवेश निश्चिती व विद्यार्थी संख्या आयोजक महाविद्यालयात करायची आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वतंत्र अर्ज भरणे अनिवार्य आहे.  

SPPU News : व्यवस्थापन परिषदेच्या दोन सदस्यांसाठी २५ ऑक्टोबरला निवडणूक

 

दरम्यान, विभागीय महोत्सवामध्ये सुगम गायक, समूह गायन, शास्त्रीय गायन, तालवाद्य, स्वरवाद्य, लोक वाद्यवृंद, लोक नृत्य, एकपात्री अभिनय, एकांकिका, मुकनाट्य, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा, स्थळ चित्र, पोस्टर मेकिंग, व्यंगचित्र, रांगोळी, मेहंदी, स्थळ छायाचित्रण मांडणी कला यांसह एकूण २९ कला प्रकारांमध्ये स्पर्धा झाली. यामधील विजेत्यांनाच विद्यापीठस्तरीय महोत्सवात संधी मिळणार आहे.

 अधिक माहितीसाठी : विभागीय महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांची नावे पाहा एका क्लिकवर...

विभागीय सत्रावरील महोत्सवात पुण्यातील सरहद कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, कोपरगांव येथील संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, नाशिक येथील के. टी. एच. एम. महाविद्यालय, बारामतीतील विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k