शिष्यवृत्ती परीक्षेला 31 हजार विद्यार्थी गैरहजर ; 8 लाख 60 हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील पाचवीचे २ हजार ७९ तर आठवीचे १ हजार ५७४ विद्यार्थी गैरहजर होते.

शिष्यवृत्ती परीक्षेला 31 हजार विद्यार्थी गैरहजर ; 8 लाख 60 हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी सुरळीतपणे पार पडली. (Scholarship Examination) मात्र,राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर (Examination Centre) झालेल्या परीक्षेदरम्यान तब्बल 31 हजार विद्यार्थी गैरहजर राहिले.त्यात विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील (Pune District) गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक (Absence of students) होती. शिक्षण विभागाने (Department of Education) दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात पाचवीचे तब्बल 2 हजार 79 तर आठवीचे 1 हजार 574 विद्यार्थी गैरहजर होते. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असताना आता परीक्षेसाठी नोंदणी करूनही विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहत असल्याची गंभीर भाग समोर आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे.त्यात 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 9 हजाराने कमी झाली. त्यात आता शिक्षणाचा एकट्या पुणे जिल्ह्यातील पाचवी व आठवीचे एकूण 3 हजार 653 विद्यार्थ्यी परीक्षेला गैरहजर राहिले. कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थींनी शिष्यवृत्ती परीक्षेला सर्वाधिक 99.14 टक्के एवढी उपस्थित दाखवली आहे. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 4 लाख 92 हजार 227 एवढे विद्यार्थी उपस्थित होते.तर आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 3 लाख 68 हजार 289 विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान, राज्यात पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५  लाख १०  हजार ७०७  एवढी होती. त्यापैकी १८ हजार ४८० विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. तर आठवीच्या ३ लाख ८१ हजार  ६१० विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ३२१ विद्यार्थ्यी गैरहजर राहिले. राज्यातील पाचवी व आठवीचे एकुण ३१ हजार ८०१ विद्यार्थी गेरहजर राहिले.