झेडपीच्या शाळांवर करदात्यांच्या पैशाचा वायफळ खर्च ; क्लस्टर स्कूलचा पर्याय; पानशेतला पहिली शाळा

पुणे जिल्हा परिषदेच्या १ हजार ५४ शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. या शाळांमध्ये एकूण १२ हजार ८९८ विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी १ हजार ८६४ शिक्षकांची नियुक्ती केली आहेत. कमी पटसंख्या असणाऱ्या या शाळांमध्ये १ किंवा २ शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना विविध विषयांचे मार्गदर्शन करतात. तसेच पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व इयत्तांचे विद्यार्थी एकाच वर्गात बसून शिक्षणाचे धडे गिरवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

झेडपीच्या शाळांवर करदात्यांच्या पैशाचा वायफळ खर्च ; क्लस्टर स्कूलचा पर्याय; पानशेतला पहिली शाळा
पानशेत येथे उभारण्यात आलेली क्लस्टर स्कूलची इमारत

राज्य शासनाकडे कर रूपाने जमा होणाऱ्या पैशातूनच विविध विकास कामांसह जिल्हा परिषदेच्या शाळांमधील zp school विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या पैशांचा अपव्यय होत असल्याचे समोर आले आहे. झेडपीच्या कमी पटसंख्या असणाऱ्या प्राथमिक शाळा बंद करून त्यांचे रुपांतर 'क्लस्टर स्कूल' मध्ये cluster school केल्यास हा पैसा सत्कारणी लागू शकतो, असे असा विश्वास आता व्यक्त केला जात आहे. पानशेत येथे झेडपीच्या १३ शाळांमधील विद्यार्थ्यांना एकाच क्लस्टर शाळेत प्रवेश देऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून शिकवले जाणार आहे. (Letest education news on eduvarta.com)

       पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण ३ हजार ६३८ शाळा आहेत. त्यातील १ हजार ५४ शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. या शाळांमध्ये एकूण १२ हजार ८९८ विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी १ हजार ८६४ शिक्षकांची नियुक्ती केली आहेत. येथे शिक्षक - विद्यार्थी प्रमाण १ : ७ एवढे असल्याचे दिसून येते. कमी पटसंख्या असणाऱ्या या शाळांमध्ये १ किंवा २ शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना विविध विषयांचे मार्गदर्शन करतात. तसेच पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व इयत्तांचे विद्यार्थी एकाच वर्गात बसून शिक्षणाचे धडे गिरवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

     जिल्हा परिषदेच्या एकूण शाळांपैकी ४०३ शाळांमध्ये प्रत्येकी १५० किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण २ लाख ३० हजार विद्यार्थ्यांपैकी निम्मे विद्यार्थी या ४०३ शाळांमध्ये शिक्षण घेतात. या शाळांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधांसाठी सुमारे ९६ कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा झाली. त्यानुसार या शाळांमधील प्रतिविद्यार्थी खर्च हा ९० हजार रुपये एवढा तर छोट्या शाळांमध्ये हाच खर्च प्रत्येक विद्यार्थ्यामागे ६.५ लाखांवर जात असल्याचे दिसून आले. एका विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकाच्या वेतनावर एका वर्षासाठी सुमारे ९ ते ११ लाख एवढा खर्च होत असल्याचे निदर्शनास आले.

      पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये २ ते ३ विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असेल तर संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक चांगली होते, असे शैक्षणिक अहवालातून समोर आले आहे. कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयांमधील गती चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 'पटसंख्या कमी आहे म्हणून शाळा बंद केली जात आहे' या दृष्टिकोनातून याकडे न पाहता विद्यार्थी कमी असल्याने त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होत नाही. त्यामुळे त्याला अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळेमध्ये शिक्षण द्यायला हवे, अन्यथा पैशाचा अपव्यय तर होणारच आहे.तसेच या विद्यार्थ्यांना सुद्धा दर्जा हीन शिक्षण मिळणार आहे,असे याकडे पहिले तर कमी पटसंख्येच्या शाळा बंदच व्हायला हव्यात, असा सकारात्मक विचार मनात येऊन जाईल.

  कोणत्या शाळेत किती विद्यार्थी आणि किती शिक्षक शिकवतात ?

 पानशेत क्लस्टर स्कूल परिसरातील सुतारवाडी जिल्हा परिषद शाळेत १८ विद्यार्थी २ शिक्षक, देशमुखवाडी शाळेत ४ विद्यार्थी १ शिक्षक, पडळवाडी शाळेत ४ विद्यार्थी १ शिक्षक, वरसगाव शाळेत ३ विद्यार्थी २ शिक्षक, घिवशी शाळेत १ विद्यार्थी १ शिक्षक, आंबेगाव शाळेत १ विद्यार्थी २ शिक्षक, चिमकोडी शाळेत ७ विद्यार्थी २ शिक्षक, वाडघर शाळेत ११ विद्यार्थी ३ शिक्षक , शिर्केवाडी १० विद्यार्थी २ शिक्षक , कुरण बुद्रुक शाळेमध्ये १२ विद्यार्थी २ शिक्षक, मधली वाडी शाळेत ७ विद्यार्थी ३ शिक्षक, वरची वाडी शाळेत ४ विद्यार्थी २ शिक्षक कुरण खुर्द २३ विद्यार्थी २ शिक्षक अशी परिस्थिती आहे. या सर्व शाळा क्लस्टर स्कूल पासून जास्तीत जास्त १६ आणि कमीत कमी ३ किलो मीटर अंतरावर आहेत. सर्व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध करून जात आहे.                      

----------------------------

 कमी पटसंख्येच्या शाळा बंद झाल्यास काय होणार?                  

 १) विद्यार्थ्यांना एकाच क्लस्टर स्कूलमध्ये शिक्षण घेता येईल.  

२)एक किंवा दोन विद्यार्थ्यांऐवजी जास्त विद्यार्थी वर्गात बसून शिक्षण घेऊ शकतील.

३) एकच शिक्षण सर्व विषय शिकवणार नाही तर वेगवेगळ्या विषयांना स्वतंत्र शिक्षक असतील.

 ४) विद्यार्थ्यांना शाळेत येण्या - जाण्यासाठी मोफत बसची सुविधा उपलब्ध असेल.    

 ५) नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून अत्याधुनिक शिक्षण मिळू शकेल. 

  ६) शिक्षकांना केवळ शिकवण्याचे काम राहील. शाळेचे प्रशासकीय काम करावे लागणार नाही.                  

७) विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या पैशाचा अपव्यय टळेल.  

८) व्यर्थ जाणारे कोट्यावधी रुपये सत्कारणी लागतील.

------------------------

" जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातील लहान शाळांमध्ये खूप कमी विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे प्रत्येक दुर्गम भागात एक क्लस्टर शाळा सुरू करून येथील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देता येऊ शकते. पानशेत क्लस्टर स्कूल सुरू करण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांना, शिक्षकांना व इतर घटकांना पूर्णपणे विश्वासात घेतले. या शाळेत प्रत्येक शिक्षक स्वतंत्र विषय शिकवणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना पिवळ्या रंगाच्या स्कूलबस मधून शाळेत येण्या-जाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी वाहतुकीचे सर्व निकष पाळले जाणार आहेत. सुमारे दीड ते दोन वर्ष पूर्ण अभ्यास करून लेट प्रोजेक्ट म्हणून क्लस्टर शाळा तयार केली आहे."

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे 

---------------

"ओडिसा राज्याने दुर्गम लहान भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची कोणतीही व्यवस्था न करता एकदम या शाळा बंद केल्या. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु, पानशेत येथे 13 गावांमधील लहान शाळांमधील विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांच्यासाठी क्लस्टर स्कूल तयार केले आहे. येत्या शैक्षणिक वर्षात जून महिन्यात ही शाळा नियमितपणे सुरू होणार आहे. तत्पूर्वी एप्रिल महिन्यात दहा ते पंधरा दिवस ट्रायल रन घेण्यात येणार आहे. तसेच शाळेचा दर एक व तीन महिन्याने शैक्षणिक गुणवत्ता वाढीचा अहवाल तपासला जाणार आहे."

- पंकज पाटील,महात्मा गांधी नॅशनल फेलो,