नोकरीची मोठी संधी! भारतीय तटरक्षक दलात 'या' पदासाठी नोंदणी सुरु 

भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, नोंदणी आज 19 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून अंतिम तारीख 6 मार्च देण्यात आली आहे.

नोकरीची मोठी संधी! भारतीय तटरक्षक दलात 'या' पदासाठी नोंदणी सुरु 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard) नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी  मोठी संधी चालून आली आहे. भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant) पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. नोंदणी 19 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मार्चपर्यंत (Closing date 6th March) देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय सैन्यात भरती (Indian Army Recruitment) होण्याची सुर्वण संधी तरुणांसाठी उपलब्ध झाली आहे. 

भारतीय तटरक्षक दलाच्या सहाय्यक कमांडंटच्या पदासाठीचा अर्ज फक्त ऑनलाइन करता येईल. अर्ज करण्यासाठी  इच्छूक उमेदवारांना अधिकृत  joinindiancoastguard.cdac.in ही  वेबसाईट देण्यात आली आहे, त्यावर तुम्ही अर्ज करू शकता.  या भरती प्रक्रियेत एकूण 70 पदांसाठी निवड केली जाणार आहे. यामध्ये जनरल ड्युटी जीडीच्या 50 पदे असून टेक (इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल) साठी 20 पदे आहेत. 

या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता रिक्त पदांनुसार बदलण्यात येत असते. जनरल ड्युटीच्या पदासाठी, उमेदवाराने किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. या पदांसाठी 21 ते 25 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्व 1 जुलै 2024 पासून वयाची गणना केली जाणार असल्याचे जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आले आहे. उमेदवारांना अर्जासह 300 रुपये शुल्क भरावे लागेल. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करता येईल. एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही. 

या पदांवरील निवड अखिल भारतीय स्क्रीनिंग चाचणीद्वारे केली जाणार आहे. ही परीक्षा अनेक टप्प्यात घेण्यात येईल. प्रत्येक दुसऱ्या टप्प्यात जाण्यासाठी पहिला एक टप्पा पार करणे उमेदवारांसाठी बंधनकारण आहे. सर्व शाखांच्या उमेदवारांना या अखिल भारतीय संगणक आधारित ऑनलाइन चाचणीचा भाग असावा लागेल. परीक्षेत 100 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी चार गुण दिले जातील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल.