बालभारतीने वाढवले पालकांचे बजेट; या पाठ्यपुस्तकांच्या किंमती २०० रुपयांच्या पार                         

पुस्तकांच्या वाढलेल्या किंमती ऐकून अनेक पालक ''आम्हाला जुनीच पुस्तके द्या'', अशी मागणी पुस्तक विक्रेत्यांकडे करत आहेत.

बालभारतीने वाढवले पालकांचे बजेट;  या पाठ्यपुस्तकांच्या किंमती २०० रुपयांच्या पार                         
Balbharati

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

काही शाळांचा निकाल (School Result) लागला असला तरी बहुतांश शाळांचा निकाल १ किंवा २ मे रोजी विद्यार्थ्यांच्या (Students) हातात पडणार आहे. तत्पूर्वी इयत्ता दहावी व बारावीची नवी पुस्तके (New Books) बाजारात दाखल झाली असून मागील वर्षाच्या तुलनेत काही पुस्तकांच्या किंमती २०० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. पुस्तकांच्या वाढलेल्या किंमती ऐकून अनेक पालक ''आम्हाला जुनीच पुस्तके द्या'', अशी मागणी पुस्तक विक्रेत्यांकडे करत आहेत. (The price of Balbharati textbooks has been increased)

दरम्यान, बालभारतीकडून यंदा छापल्या जात असलेल्या इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या पुस्तकांच्या किंमतीतही सुमारे ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाळांचे निकाल जाहीर झाले की पालकांना व विद्यार्थ्यांना नव्या पुस्तकांची आठवण येते. परंतु, यंदा नवी पाठ्यपुस्तके पालकांचा खिसा रिकामा करणार आहेत. कारण कागदाच्या किंमती छपाईचा खर्च आणि वाहतूक यामध्ये मोठी वाढ झाली असल्याने पाठ्यपुस्तकाच्या किंमतीतही वाढ करण्याचा निर्णय बालभारतीने घेतला आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत बहुतांश सर्व पुस्तके विक्रीसाठी बाजारात दाखल होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : MPSC Exam : आजच्या परीक्षेने केले दोन विक्रम; आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच...                                   

दहावी-बारावीत गेलेल्या विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये खाजगी शिकवण्यामध्ये जाण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पालक बाजारात पुस्तके खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. आठवड्याभरापूर्वी बालभारतीकडून इयत्ता दहावी व बारावीची नवीन पुस्तके बाजारात दाखल झाली आहेत. परंतु इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेच्या आणि दहावीच्या सर्व विषयांच्या पुस्तकांच्या किमतीत १३ ते २२ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे नवीन पुस्तकाच्या संचाऐवजी मागील वर्षाचा शिल्लक असलेला पुस्तकाचा संच द्यावा, अशी मागणी पालक पुस्तक विक्रेत्यांकडे करत आहेत.  

इयत्ता बारावीच्या मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषा विषयांच्या पुस्तकांची किमती १०४ वरून १२२ रुपयांपर्यंत वाढली आहे. तर फिजिक्स विषयाच्या पुस्तकाची किंमत १९३ वरून २३३ रुपये, केमिस्ट्रीची किंमत १८७ वरून २२६ रुपये गणित विषयाच्या पुस्तकाची किंमत १४८ रुपयांवरून १७६ रुपये तर बायोलॉजी विषयाच्या पुस्तकाची किंमत १७८ वरून २३३ रुपयांपर्यंत वाढली आहे, असे अप्पा बळवंत चौकातील पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले.

 

इयत्ता दहावीच्या पुस्तकाच्या किंमती

विषय     जुनी किंमत नवी किंमत

मराठी        ७३    ८६

इंग्रजी        ८८    १२१

इतिहास      ५६    ७६

भूगोल       ४३    ५८ 

विज्ञान एक   ७५    ९६ 

विज्ञान दोन   ६५    ८८

गणित एक    १०५   १०५

गणित दोन   ७८    ११३