नाना पटोलेंच्या कार्यक्रमाला पुणे विद्यापीठाकडून नकार; विद्यार्थी संघटना मात्र ठाम

काही दिवसांपूर्वीच युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी विद्यापीठात येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.

नाना पटोलेंच्या कार्यक्रमाला पुणे विद्यापीठाकडून नकार; विद्यार्थी संघटना मात्र ठाम
Congress State President Nana Patole

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. पण हा कार्यक्रम घेण्यावर विद्यार्थी संघटना ठाम असल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कार्यक्रमाच्या दिवशीच जी-२० परिषद असल्याने परवानगी दिली नसल्याचा दावा विद्यार्थी संघटनांनी (Students organisation) केला आहे. (The program of Congress state president Nana Patole is not allowed by SPPU)

काही दिवसांपूर्वीच युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी विद्यापीठात येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर आता विद्यापीठातील काही विद्यार्थी संघटनांनी नाना पटोले यांना विद्यापीठात निमंत्रित केले आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध शैक्षणिक अडचणी तसेच वसतिगृह व मेसचा दर्जा, नवीन शैक्षणीक धोरण अशा विषयांवर नाना पटोले विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते. हा कार्यक्रम १० मे रोजी होणार होता.

हेही वाचा : चूक समाजकल्याणची अन् शिक्षा विद्यार्थ्यांना: शिष्यवृत्तीचा हप्ता न मिळाल्याने महाविद्यालयांकडून अडवणूक

विद्यार्थी संघटनांकडून कार्यक्रमासाठी सभागृह मिळावे, यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी केली होती. त्याबाबत तीन मे रोजी कुलसचिवांना पत्र दिले होते. पण या कार्यक्रमाला अद्यापही परवानगी मिळालेली नाही. याबाबत प्र कुलगुरुंशी बोलणे झाले, त्यावेळी त्यांनी जी-20 कार्यक्रम असल्याने त्यादिवशी कार्यक्रमाला परवानगी मिळणार नाही, असे कळवण्यात आले. परंतु लेखी आम्हाला काहीही देण्यात आले नाही, असा विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींना केला आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांविषयी चर्चेसाठी विद्यापीठ प्रशासन परवानगी देत नसेल तर आम्ही कार्यक्रम घेण्यावरती ठाम आहोत. त्याचदिवशी ठरलेल्या वेळेत कार्यक्रम होईल, असे पत्र विद्यार्थी संघटनांनी प्रशासनाला दिले आहे. यावेळी कुलदीप आंबेकर, राहुल ससाणे, नितीन आंधळे, नारायण चापके, गजानन अडबलवार,तुकाराम शिंदे,सागर अलकुंटे उपस्थित होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2