Garware College : गरवारे कॉलेजच्या प्राचार्य पदी डॉ. विलास उगले यांची नियुक्ती

विलास उगले हे शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तब्बल पंधरा वर्षाहून अधिक कालावधीपासून ते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहत होते.

Garware College : गरवारे कॉलेजच्या प्राचार्य पदी डॉ. विलास उगले यांची नियुक्ती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे शहरातील नामांकित महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्य  पदी  (Principal of Abasaheb Garware College) डॉ. विलास उगले (Dr. vilas ugale ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाविद्यालयाचे प्राचार्य पद रिक्त होते.उगले यांच्या नियुक्तीने महाविद्यालयाला पूर्णवेळ प्राचार्य मिळाले आहेत.

हेही वाचा : शिक्षण ‘नॅक’ बाबत विद्यापीठांचे तोंडावर बोट! देवळाणकरांनी मागवली संलग्नता काढलेल्या महाविद्यालयांची यादी

विलास उगले हे शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तब्बल पंधरा वर्षाहून अधिक कालावधीपासून ते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहत होते. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच पाणी फाउंडेशनतर्फे जल रत्न पुरस्कार, सर्वपल्ली राधाकृष्णन आयडियल पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर तसेच विद्यापीठाने नियुक्त केलेल्या विविध समित्यांवर त्यांनी काम पाहिले आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. आता गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आले आहे.