NSS Awards : राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये मुंबई विद्यापीठाचा दबदबा; कुणाची उल्लेखनीय कामगिरी? संपूर्ण यादी पाहा...

राज्यात १९९३-९४ पासून हे पुरस्कार दिले जात आहेत. राज्यस्तरीय निवड समितीने दिलेल्या गुणांच्या आधारे व शिफारशीनुसार पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली आहे.

NSS Awards : राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये मुंबई विद्यापीठाचा दबदबा; कुणाची उल्लेखनीय कामगिरी? संपूर्ण यादी पाहा...
NSS Award

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत (NSS) राज्यस्तरावर देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून (Higher and technical Education Department) करण्यात आली आहे. त्यानुसार सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) पटकावला आहे. तर याच विद्यापीठातील सुधीर पुराणिक यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून गौरविण्यात आले आहे. हे पुरस्कार २०२१-२२ या वर्षासाठीचे आहेत. (Maharashtra Government)

 

राज्यात १९९३-९४ पासून हे पुरस्कार दिले जात आहेत. राज्यस्तरीय निवड समितीने दिलेल्या गुणांच्या आधारे व शिफारशीनुसार पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली आहे. सुरूवातीची प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात आली. या प्रक्रियेअंती कार्यक्रम समन्वयक तथा संचालक, कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक यांचे संबंधित विद्यापीठाने प्रथम गुणानुक्रम जाहीर केलेले प्रस्ताव, याची हार्ड कॉपीसह माहिती शासनास प्राप्त झाली.

ट्रेकिंगला गेलेल्या विद्यार्थ्यांना चक्कर येण्यामागे गौडबंगाल? कट रचल्याचा संशय

 

राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीस प्राप्त झालल्या प्रस्तावांची छाननी व निवड प्रक्रिया यासाठी ऑनलाईन प्रस्तावांमध्ये गुणांची जास्त तफावत, अवाजवी गुण, अत्यल्प गुण, निरंक गुण या उणिवा होत्या. त्यामुळे ऑनलाईन गुणांऐवजी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांमधील मुद्यांनुसार परिक्षण, मुल्यांकनासाठी गुण देण्याचे निश्चित करत निवड समितीने ही निवड केल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

 

राज्यस्तरीय पुरस्कारांची यादी पुढीलप्रमाणे -

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO