CBSE Result : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पहा निकालाचे अपडेट...

इयत्ता बारावीच्या परीक्षेचा (12th Result) निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसईने विविध संकेतस्थळावर व मोबाईल ॲप द्वारे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यास उपलब्ध करून दिला आहे.

CBSE Result : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पहा निकालाचे अपडेट...
CBSE 12th Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळमार्फत (CBSE) २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा (12th Result) निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसईने विविध संकेतस्थळावर व मोबाईल ॲप द्वारे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यास उपलब्ध करून दिला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ६.०१ टक्क्यांनी अधिक आहे. मुलींचा निकाल ९०.८६ टक्के असून मुलांचा निकाल ८४. ६७ टक्के एवढा लागला आहे.

सीबीएसईने १५ फेब्रुवारी ते ५ एप्रिल या कालावधीत इयत्ता बारावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. देशभरातील १६ हजार ७२८ शाळांमधील १६  लाख ८० हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १६ लाख ६० हजार ५११ विद्यार्थी परीक्षेस  बसले. त्यामधील १४ लाख ५० हजार १७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता बारावीचा एकूण निकाल ८६. ३३ टक्के लागला आहे. सीबीएसईच्या इयत्ता बारावीचा निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.३८ टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी सीबीएसईचा बारावीचा निकाल ९२.७१ टक्के लागला होता.                                

विभागनिहाय निकाल खालील प्रमाणे - त्रिवेंद्रम ९९.९१, बेंगलुरू ९८.६४, चेन्नई ९७.४०, दिल्ली वेस्ट  ९३.२४, चंदीगढ ९१.८४, अजमेर ८९.२७, पुणे ८७.२७, पंचकुला ८६.९३, पटना ८५.४७, भुवनेश्वर ८३.८९, गुवाहाटी ८३.७३, भोपाळ ८३.५४, नोएडा ८०.३६.

या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध -

https://www.cbse.gov.in

https://www.result.nic.in

https://www.results

https://results.digilocker.gov.in

https://umang.gov.in