ट्रेकिंगला गेलेल्या विद्यार्थ्यांना चक्कर येण्यामागे गौडबंगाल? कट रचल्याचा संशय

IIEBM संस्थेकडून ४ नोव्हेंबर रोजी राजमाची येथे ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रेकिंगमध्ये संस्थेतील ३०० विद्यार्थी सामील झाले होते.

ट्रेकिंगला गेलेल्या विद्यार्थ्यांना चक्कर येण्यामागे गौडबंगाल? कट रचल्याचा संशय
IIEBM

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील वाकड येथील इंडस बिझनेस स्कुल (IIEBM) च्या ट्रेकिंगला गेलेल्या १३ विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्यामुळे मंगळवारी (दि. ७) या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. शनिवारी ट्रेकिंगला (Trekking) गेलेल्या विद्यार्थ्यांची तब्येत सोमवारी सकाळपर्यंत ठीक होती, त्या नंतर ती बिघडली, शिवाय रुग्णालयात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी ट्रेकिंगला गेलेच नव्हते, त्यामुळे या सर्व प्रकरणामागे काहीतरी कट रचला गेला आहे, अशी शंका संस्थेकडून व्यक्त केली जात आहे. 

 

IIEBM संस्थेकडून ४ नोव्हेंबर रोजी राजमाची येथे ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रेकिंगमध्ये संस्थेतील ३०० विद्यार्थी सामील झाले होते. यापैकी काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना सोमवारी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल घडलेल्या या प्रकरणानंतर IIEBM संस्थेकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे.

राज्यातील तब्बल ५५० वसतिगृहातील विद्यार्थ्यांना केवळ चार ठेकेदार पुरवणार जेवण; प्रक्रिया वादात

 

याविषयी 'एज्युवार्ता' शी बोलताना संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक जयसिंग मारवाह म्हणाले, "आमच्या संस्थेतील विद्यार्थी शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी ट्रेकिंगला गेली होते. तिथून परतत असताना चार विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर लगेच लोणावळा येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. ट्रेकिंगला गेलेले विद्यार्थी शनिवारी संध्याकाळी कॉलेजमध्ये परतले. रविवारी सगळे व्यवस्थित होते. सोमवारी सकाळी इतर विद्यार्थ्यांसोबत ट्रेकिंग ला गेलेले विद्यार्थीही  असेम्बली मध्ये सहभागी झाले होते. असेम्बली नंतर सगळ्या विद्यार्थ्यांनी नाश्ता करून वर आपापल्या वर्गात गेले. सीसीटीव्ही मध्ये हा सगळा घटनाक्रम रेकॉर्ड झाला आहे."

 

"विद्यार्थी वर्गात गेल्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली. ११ विद्यार्थ्यांना आम्ही रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे यापैकी ३ विद्यार्थी ट्रेकिंगला गेलेच नव्हते, तरीही त्यांची तब्येत बिघडली. "ट्रेकिंगला गेलेल्या विद्यार्थ्यांची दोन दिवसानंतर तब्येत बिघडते, जे विद्यार्थी ट्रेकिंगला गेलेच नव्हते, त्यांचीही प्रकृती बिघडली हे सर्व संशयास्पद वाटते, कुणीतरी आमच्या विद्यार्थ्यांना फूस लावून त्यांची दिशाभूल करत आहेत. आमच्या संस्थेचे नाव खराब करण्यासाठी हा कट  रचण्यात आला आहे," असा आरोप जयसिंग मारवाह यांनी केला आहे. यासंदर्भात संस्थेने पोलिसांना सर्व माहिती दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO