मणिपूरच्या आगीत होरपळलेल्या आठ वर्षाच्या जय जेमला केरळने घेतले दत्तक

मे महिन्यात जेव्हा मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु झाला होता, तेव्हाच काही समाजकंटकांनी जय जेम हिचे घर पेटवून दिले होते, त्यात तिचे आई वडील आणि दोन भाऊ जळून खाक झाले.

मणिपूरच्या आगीत होरपळलेल्या आठ वर्षाच्या जय जेमला केरळने घेतले दत्तक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Manipur News : ती अवघी ८ वर्षांची लहानगी. समाजकंटकांनी तिचे संपूर्ण कुटुंब, तिचं घर आगीत लोटून दिले. ती वाचली हे तिचे नशीब पण पुढे काय? शेवटी तिच्या दूरच्या नातेवाईकांनी तिला केरळला आणले. पण  होयनेगेम ऊर्फ जय जेम (Jay Jem) या छोट्या मुलीसाठी संपूर्ण केरळ राज्याचे शिक्षण विभाग (Education Department) पुढे सरसावला आहे. कोणत्याही कागदपत्रांशिवाय लगेच तिला इयत्ता तिसरीच्या वर्गात प्रवेश देण्यात आला असून जणू आता केरळने (Kerala) दिला दत्तकच घेतल्याची भावना तेथील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

केरळ राज्यातील थायकॉड येथील मॉडेल गव्हर्नमेंट एलपी स्कूलमध्ये जय जेम ला तिसरी इयत्तेत प्रवेश देण्यात आला आहे. मे महिन्यात जेव्हा मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु झाला होता, तेव्हाच काही समाजकंटकांनी जय जेम हिचे घर पेटवून दिले होते, त्यात तिचे आई वडील आणि दोन भाऊ जळून खाक झाले. ही मात्र वाचली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला केरळला आणले.

वाबळेवाडी शाळा प्रकरण : आमदार अशोक पवार यांना गावबंदी, गावकऱ्यांनी घेतला निर्णय

जून मध्ये शैक्षणिक वर्ष सुरु झाले. पण जय जेम ला शाळेत पाठवायचे तर तिच्याजवळ ना तिच्या जन्माचा दाखला ना शाळेचा. ही बाब जवळच्या शाळा प्रशासनाला समजली. त्यांनी लगेच शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून थायकोड येथे मणिपूर दंगलीतील एक मुलगी आहे, तिला शाळेत प्रवेश मिळाला तर ती तिच्या कटू आठवणींतून बाहेर पडेल असे सांगितले. शिक्षण अधिकाऱ्यांनीही त्यांच्या अधिकाराचा वापर करत लगेच तिला शाळेत प्रवेश देण्याचे आदेश दिले.

ही बाब जेव्हा राज्य शिक्षण मंडळाला समजली तेव्हा त्यांनी जय जेम हिच्या शिक्षणाची सर्व सोय केली. शिवाय केरळ मध्ये बंधनकारक असलेला मल्याळी भाषा हा विषय ही तिच्या अभ्यासक्रमातून तात्पुरता वगळण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्याचे शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी तिला भेटायला शाळेत आले होते. त्यावेळी ती आपल्या नवीन मित्र मैत्रिणीसोबत खेळात मग्न असल्याचे दिसली. जय जेम ही केरळची दत्तक कन्या आहे, असे शिवनकुट्टी यांनी म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत महत्वाचा बदल

मणिपूरच्या विद्यार्थ्यांसाठी इतर राज्येही सरसावली

सध्या हिंसाचाराने प्रभावित झालेल्या आणि संपुर्ण देशासाठी काळजीचा विषय बनलेल्या मणिपूर मधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. अशा परिस्थितीत तिथल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी देशातील इतर राज्यातील शिक्षण मंडळे  आणि उच्च शिक्षण विभाग पुढे सरसावले आहेत. दिल्लीच्या शिक्षण विभागाने हिंसाचाराने प्रभावित झालेल्या मणिपूरमधील मुलांना तात्पुरते प्रवेश देण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मणिपूरच्या  विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे त्यांच्याजवळ नसली तरी त्यांना  प्रवेश देण्याची तजवीज करण्यात आली आहे.  

कर्नाटक शिक्षण विभागही या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. कर्नाटक  सरकारने एक आदेश जारी केला आहे. ज्यामध्ये  म्हटले आहे कि, "मणिपूरमधील इयत्ता १ ते १० पर्यंतचे विद्यार्थी, जे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी राज्य अभ्यासक्रमानुसार शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात, त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे नसल्यास, त्यांचे अर्ज विशेष मानले जातील.  त्यांना जन्म प्रमाणपत्र, हस्तांतरण प्रमाणपत्र किंवा इतर कोणतेही दस्तऐवज प्रदान करण्याची सक्ती न करता त्यांची नोंदणी करावी. शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्याकडून किंवा पालकांकडून स्व-प्रमाणपत्र घेतले पाहिजे आणि ज्या वर्गात विद्यार्थी आधीच्या शाळेत होता त्याच वर्गात त्यांची नोंद करावी."

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD