NEET UG परीक्षेला बसता येणार नाही; त्यामुळे या गोष्टी सोबत घेऊन जाणे टाळा 

NTA ने धार्मिक वस्तू परिधान केलेल्या उमेदवारांना रिपोर्टिंग वेळेच्या किमान 2 तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचा सल्ला दिला आहे.

NEET UG परीक्षेला बसता येणार नाही; त्यामुळे या गोष्टी सोबत घेऊन जाणे टाळा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे  NEET UG परीक्षा येत्या रविवारी (दि.5 ) आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी हॉल तिकिट नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. हॉल  तिकिट पाठोपाठ NTA ने विद्यार्थ्यांसाठी आणखीन एक महत्वाची सूचना जरी केली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना कोणत्या वस्तू टाळाव्यात याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सूचनेचे पालन न करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही, (Students will not be allowed to enter the examination)असा इशाराही NTA ने दिला आहे. 

परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी उमेदवारांची कसून तपासणी केली जाईल. यामध्ये अत्याधुनिक मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना  मोबाईल फोन, ब्लूटूथ, इअरफोन, मायक्रोफोन, पेजर, हेल्थ बँड इत्यादी वस्तू परीक्षा केंद्रात जाताना जवळ बाळगता येणार नाही. तसेच परीक्षा केंद्रात पाकीट, सनग्लासेस, हँडबॅग, बेल्ट, टोपी इत्यादी गोष्टी घालण्यास किंवा नेण्यास मनाई आहे. घड्याळे/मनगटावरील घड्याळे, ब्रेसलेट, कॅमेरा इत्यादी निषिद्ध आहेत. यशिवाय परीक्षा हॉलमध्ये दागिने/धातूच्या वस्तू घवून जाता येणार नाही. तसेच तुम्ही कोणतेही खाद्यपदार्थ, उघडे किंवा पॅक केलेले किंवा पाण्याची बाटली घेऊन परीक्षा केंद्रावर जाऊ शकत नाही. 

हेही वाचा : शिक्षण NEET UG : हॉल तिकिटावर आवश्यक माहिती ठळक नसेल ; तर परीक्षेला प्रवेश नाही

NTA ने धार्मिक वस्तू परिधान केलेल्या उमेदवारांना रिपोर्टिंग वेळेच्या किमान 2 तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. जर छाननी दरम्यान असे आढळून आले की उमेदवार धार्मिक वस्तू असलेले कोणतेही संशयास्पद यंत्र घेऊन जात आहे, तर त्याला परीक्षा हॉलमध्ये ते नेण्याची परवानगी दिली जाणार नाही.

" न्यायालयांच्या सर्व आदेशांचे पालन परीक्षेसाठी केले जाईल. परीक्षा केंद्रांवर उमेदवारांचे कोणतेही सामान ठेवण्याची व्यवस्था केली जाणार नाही. त्यामुळे NEET परीक्षेत निषिद्ध वस्तू बाळगू नका. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला ते सामान बाहेर सोडावे लागेल. त्याच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्राची असणार नाही," अशी स्पष्ट सूचना NTA ने दिली आहे.