स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून कनिष्ठ अभियंता पदाची भरती सुरू ; अर्जाची तारीख जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण 968 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून कनिष्ठ अभियंता पदाची भरती सुरू ; अर्जाची तारीख जाहीर

SSC कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू 

स्टाफ सिलेक्शन कमिशनने  (SSC) कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)पदासाठी अर्ज  प्रक्रिया सुरू केली आहे. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवार 18 एप्रिल 2024 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. इच्छूक उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाईट ssc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतील.  अर्ज केल्यानंतर, नोंदणीकृत उमेदवार येत्या 22 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीत त्यांच्या अर्जामध्ये सुधारणा देखील करू शकतात.

स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण 968 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, मिलिटरी इंजिनीअर सर्व्हिसेससह अनेक केंद्रीय विभागांमध्ये JE च्या रिक्त पदांवर भरती केली जाईल. उमेदवार त्यांच्या पात्रतेनुसार विहित अंतिम तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

कनिष्ठ अभियंत्याच्या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील अभियांत्रिकी डिप्लोमा असणे आवश्यक आहे. अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे. तसेच एससी आणि एसटी प्रवर्गातील अर्जदारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

 या पदासाठी अर्ज करणाऱ्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. तर SC, ST आणि अपंग प्रवर्गातील अर्जदारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.