CET CELL : बीबीए / बीसीए./बीएमएस/ बीबीएम प्रवेश पूर्व परीक्षेस अर्ज करण्यास दोन दिवस मुदतवाढ; शेवटची संधी

सीईटी सेल तर्फे बीबीए / बीसीए./बीएमएस/ बीबीएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी येत्या 27 ते 29 मे या कालावधीत सीईटी घेतली जाणार आहे. 

CET CELL : बीबीए / बीसीए./बीएमएस/ बीबीएम प्रवेश पूर्व परीक्षेस अर्ज करण्यास दोन दिवस मुदतवाढ; शेवटची संधी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामाईक प्रवेस परीक्षा (State Common Entrance Test Cell)कक्षातर्फे महाराष्ट्र राज्यात प्रथमच बीबीए / बीसीए./बीएमएस/ बीबीएम (BBA/BCA/BMS/BBM )या अभ्यासकमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात सीईटी (Pre-Entry Examination i.e. CET)घेतली जात असून या सीईटीसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज करण्यास दोन दिवस मुदतवाढ (Two days deadline for applications)देण्यात आली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना 4 व 5 मे या कालावधीत परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड (MBA Integrated and MCA Integrated)अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सुध्दा ही सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे.सीईटी सेल तर्फे येत्या 27 ते 29 मे या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार आहे. 

राज्य सामाईक प्रवेस परीक्षा कक्षातर्फे 2024-25 या शैक्षणिक वर्षात बीबीए / बीसीए./बीएमएस/ बीबीएम तसेच मबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा देणे अनिवार्य आहे.अद्याप परीक्षेसाठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना सीईटी सेलने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दोन दिवस मुदतवाढ दिली आहे.त्यामुळे या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्याची विद्यार्थ्यांना शेवटची संधी आहे.

--------------------------------------------